logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

गुजरातमधील गिरनार पर्वत 'श्री दत्त पादुका रक्षण अभियान....* *महाराष्ट्रांतून १९ व २० जुलै रोजी 'लाखो भक्त उपस्थितीत राहणार....

महादू पवार, मुंबई
मुंबई, (प्रतिनिधी)
श्री गुरु दत्तात्रेय समस्त भक्त मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गुजरातमधील गिरनार पर्वतावरील गुरुशिखर येथे असलेल्या श्री दत्त महाराजांच्या पवित्र पादुकांच्या संरक्षणासाठी राज्यव्यापी अभियान जाहीर करण्यात आले आहे. श्री दत्त महाराजांच्या पावन पादुकांवर दरवर्षी काही समाजकंटकांकडून घेतल्या जाणाऱ्या आक्षेपाच्या विरोधात आता महाराष्ट्रातील दत्तभक्तांनी संघटित लढा उभारण्याचा निर्णय घेतला असून, 'चलो गिरनार लाखोच्या संख्येने' अशी हाक समस्त दत्तभक्तांना देण्यात आली असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष श्री प्रमोद पाटील यांनी दिली.
या अभियानासाठी शांततामय मार्गाने मोठ्या संख्येने भक्तांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. श्री दत्त महाराजांचे शिष्य आणि भक्त म्हणून त्यांच्या या परमपवित्र स्थानाचे रक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. यावर्षी जुलै महिन्यामध्ये हा संघर्ष अधिक तीव्रतेने, परंतु पूर्णपणे शांततामय मार्गाने लढण्यासाठी संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रातील दत्तभक्तांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
या अभियानाचा मुख्य कार्यक्रम रविवार, १९ जुलै आणि सोमवार, २० जुलै २०२६ रोजी (आषाढ शुद्ध सप्तमी) आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी गिरनार येथे लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून एकता आणि श्रद्धेची ताकद दाखवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. श्री गुरुदेव दत्तात्रेयांनी दिलेली जबाबदारी ओळखून या लढाईमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री गुरु दत्तात्रेय समस्त भक्त मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी श्री गुरु दत्तात्रेय समस्त भक्त मंडळ, स्प्रिंग मिल कंपाऊंड, ग.द. आंबेकर मार्ग, नायगाव, दादर (पूर्व), मुंबई ४०००१४ येथे अथवा ८८७९१७७७११, ९९६७३३२२४२, ८८२८८१२१२२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रमोद पाटील यांनी केले.

5
13 views

Comment