logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

Chhatrapati Sambhajiraje : बाबा बुवांनी अधात्म सांगावं, मनाला वाटेल तसा इतिहास सांगू नये; छत्रपती संभाजीराजेंचा धीरेंद्र शास्त्रींना इशारा

Dhirendra Shastri Statement : धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचे संबंध गुरूशिष्याचा असल्याचा दावा केला होता. त्यावर छत्रपती संभाजीराजे यांनी टीका केली आहे.

कोल्हापूर : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासांसंबंधी केलेल्या वक्तव्यावरुन चांगलाच वाद रंगल्याचं चित्र आहे. माजी खासदार छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. बाबा बुवांनी अध्यात्म सांगावं, मनाला वाटेल तसा इतिहास सांगू नये असं संभाजीराजे म्हणाले. तसचे अध्यात्म आणि इतिहास यांची सरमिसळ करून त्याची अहवेलना करू नये असंही ते म्हणाले.

Chhatrapati Sambhajiraje Post : काय म्हटलंय संभाजीराजेंनी?
बुवा बाबांनी अध्यात्म सांगावे. मनाला वाटेल तसा इतिहास सांगत बसू नये. हिंदू धर्माच्या अध्यात्माची आणि इतिहासाची उंची अत्युच्च आहे. त्याची वाटेल तशी आणि चुकीच्या पद्धतीची सरमिसळ करून अध्यात्माची आणि इतिहासाची अवहेलना करू नये.

Dhirendra Shastri Statement : नेमकं काय म्हटलेलं धीरेंद्र शास्त्रींनी?
नागपुरात जामठा इथे एका कार्यक्रमात बोलताना बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचे संबंध गुरूशिष्याचा असल्याचा दावा करत त्यांच्या नात्याचा एक किस्सा सांगितला. शिवाजी महाराज युद्ध करून थकले तेव्हा एक दिवस ते समर्थ रामदास स्वामींकडे गेले आणि आपला मुकूट उतरवून रामदास स्वामींना दिला. आता हे राज्य तुम्ही सांभाळा अशी विनंती केली. त्यावर रामदास स्वामींनी हसून मी राज्य चालवतो, तुम्ही अंमलबजावणी करा असं म्हटलं असा दावा धीरेंद्र शास्त्रींनी केला.

तसंच हिंदूंनी चार मुलं जन्माला घालावी आणि एकाला आरएसएसचा स्वयंसेवक करावा असं आवाहनही हिंदू समाजाला केलं. जगातील पहिले भारतदुर्गा मंदिरा भव्य शिलान्यास सोहळा शुक्रवारी पार पडला. या कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्रींनी हे वक्तव्य केलं.

काँग्रेसचा आक्रमक पवित्रा
धीरेंद्र शास्त्रींच्या वक्तव्यानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावर पत्रकार परिषद घेतली. त्यांनी धीरेंद्र शास्त्रींच्या वक्तव्याचा समाचार घेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही निशाणा साधला. सोबतच मुख्यमंत्री फडणवीस आणि संघाने जाहीर माफी मागावी, अशी मागणीही केली. तर भाजपकडून छत्रपती शिवरायांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न होत आहे आणि हा मनुवादी विचारसरणीचा कट असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.

शिवराय थकले आणि राजपाट समर्थांकडं दिला, हे धीरेंद्र शास्त्री यांचं विधान अत्यंत संतापजनक आहे. अशी विधानं करून महाराष्ट्राच्या संत परंपरेला आणि विचारांना गालबोट लावण्याचा प्रयत्न असल्याची टीका आमदार रोहित पवारांनी केली. तर धीरेंद्र शास्त्रींच्या वक्तव्यावरून आमदार अमोल मिटकरींनी हल्लाबोल केला. धीरेंद्र शास्त्रींच्या तोंडून वदवून घेतलेला चुकीचा इतिहास खपवून घेणार नाही असं त्यांनी सुनावलं. धीरेंद्र शास्त्रींना खरात बाबाच्या सोबत ट्रिटमेंटला पाठवायला हवा असं त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं.

0
985 views

Comment