logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

कांतीलाल खिवंसारा बी एड महाविद्यालय मार्फत आरोग्य व स्वच्छाता शिबीराचे आयोजन

पुणे ता 25: कांतिलाल खिवंसरा बी.एड.महाविद्यालय,थेरगाव यांच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या संयुक्त संयोजनातून क्रांतीवीर चाफेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुल ,चिंचवड येथील निवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसाठी आरोग्य व स्वच्छता शिबिराचे आयोजन करण्यात आले,यावेळी शिबिरासाठी आरोग्य व स्वच्छता विषयावर लोकमान्य हॉस्पिटलचे डॉ.विशाल क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी निवासी शाळेतील मुलांसाठी प्रथम वर्ष छात्र आध्यापिका सविता पवार यांनी कपड्याचे वाटप केले तर बी.एड,कॉलेज तर्फे धान्य व डाळीचे वाटप करण्यात आले.त्याच बरोबर विद्यार्थ्यांकडून शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.सदर शिबराचे नियोजन कॉलेजच्या प्राचार्या प्रा.नीता पुरी यांच्या मार्गदर्शना खाली झाले.सदर शिबिरा साठी प्रा.ज्योती डावखर,प्रा मृणालिनी पाटील,प्रा.सुरेखा राजवंत,प्रा.शुभांगी बालघरे,प्रा.शैलजा चतुर्वेदी यांनी शिबीर यशस्वी पार पडले.प्रथम वर्ष बी एड मधील बहुसंख्या शिक्षक विधार्थिनी सहभाग घेतला. प्रास्ताविक प्रा.डावखर मॅडम यांनी केले, सूत्रसंचलन गौरी वेलणकर यांनी केले आणि आभार शुभांगी कोळपे यांनी मानले. ‎

2
205 views

Comment