सरकारी दवाखान्यात स्थायी डॉक्टर नसल्यास
अन्तुर्लि (ता. मुक्ताईनगर, जि. जळगांव) येथील सरकारी दवाखान्यास स्थायी डॉक्टर देण्याची मागणी
डॉक्टरांच्या अभावामुळे ग्रामस्थ त्रस्त, प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची गरज
अन्तुर्लि, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगांव येथील सरकारी दवाखान्यात सध्या स्थायी डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावातील तसेच परिसरातील रुग्णांना प्राथमिक उपचारांसाठीही इतर ठिकाणी जावे लागत असल्याने गोर गरीब लोकांना त्रास सहन करावं लागत आहे.
विशेषतः वृद्ध, महिला आणि लहान मुलांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीत योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. शासनाने ग्रामीण भागात उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले असताना, या दवाखान्यात डॉक्टर नसणे ही चिंतेची बाब आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे शासनाने तात्काळ लक्ष देऊन अन्तुर्लि येथील सरकारी दवाखान्यात स्थायी डॉक्टर नेमावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
ऑल इंडिया मीडिया असोसिएशन
प्रतिनिधी – मनोहर कुंभार