यवतमाळ जिल्हा बंदची घोषणा; कृषी विक्रेत्यांचा बेमुदत आंदोलनाचा इशारा
अर्णी, यवतमाळ | AIMA Media
यवतमाळ जिल्ह्यातील कृषी साहित्य विक्रेत्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवार, २७ एप्रिल २०२६ पासून बेमुदत जिल्हा बंदची घोषणा केली आहे. या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील सर्व कृषी साहित्य विक्रेते सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कृषी विक्रेत्यांच्या मते, शासनाकडून होत असलेल्या अन्यायकारक धोरणांमुळे व वाढत्या अडचणींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने तात्काळ दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
📌 प्रमुख मागण्या:
अनधिकृत एच टी बी टी बियाणे विक्रीवर बंदी घालावी
खत कंपन्यांकडून होणाऱ्या लिंकींग पद्धतीचा विरोध
अवैध कीटकनाशके व खतांची अनधिकृत विक्री थांबवावी
जाचक अटींमुळे विक्रेत्यांवर होणारा अन्याय थांबवावा
नवीन बियाणे व कीटकनाशक कायद्यांमध्ये सुधारणा करावी
दुकान सील करण्यासारख्या कठोर कारवाईचा पुनर्विचार करावा
या बंदमध्ये सर्व कृषी साहित्य विक्रेते, बियाणे विक्रेते व संबंधित व्यावसायिक सहभागी होणार असून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवक्ता: बिलाल शाह
अर्णी, यवतमाळ
AIMA Media