logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

महापालिकेत पोलिसांचा तळ, कागदपत्रांची झाडाझडती

जळगाव : रस्ते डांबरीकरणाच्या कामात महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी आणि व्याजासह सुमारे ४१ कोटी ३४ लाख रुपयांच्या रकमेचा अपहार

केल्याच्या आरोपावरून 'अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि.' विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी
दिले आहेत. या कारवाईसाठी शहर अभियंता योगेश बोरोले यांना प्राधिकृत केले आहे. नगरसेवक अरविंद देशमुख यांच्या तक्रारीची दखल घेत शहर, पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी गुरुवारी पथकासह महापालिकेत धडक दिली. सकाळी ११ वाजेपासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे पथक महापालिकेत तळ ठोकून होते.

8
439 views

Comment