logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

घरकुल OFFLINE, शेतकऱ्यांची कामे ONLINE — रोजगार हमीत दुहेरी निकष?


जामखेड (AIMA MEDIA):
तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कामांच्या अंमलबजावणीत गंभीर विसंगती दिसून येत आहे. घरकुल कामांसाठी ऑफलाईन हजेरी दिली जात असताना, फळबाग, विहीर व गाईगोठा या वैयक्तिक लाभाच्या कामांसाठी ऑनलाईन हजेरीची सक्ती करण्यात येत आहे.
ग्रामीण भागात नेटवर्कची अडचण, तांत्रिक समस्या आणि मोबाईल अॅपमधील अडथळ्यांमुळे ऑनलाईन हजेरी देणे अनेक ठिकाणी शक्य होत नाही. परिणामी ही कामे पूर्णपणे ठप्प झाली असून लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
घरकुलांना सवलत आणि इतर कामांवर कठोर नियम असा भेदभाव का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या दुहेरी धोरणामुळे शेतकरी व गरजू वर्ग वंचित राहत असल्याची भावना वाढत आहे.
📢 प्रशासनाने तात्काळ निर्णय घेऊन सर्व कामांसाठी एकसमान हजेरी पद्धत लागू करावी व बंद पडलेली कामे सुरू करावीत, अशी मागणी होत आहे.
#AIMAMedia #AIMANews #AIMAExclusive #MGNREGA #रोजगारहमी #Jamkhed #MaharashtraNews #BreakingNews

5
4765 views

Comment