" २३ - एप्रिल - वाचन संस्कृती दिन "
माझं शिर्षक गीत " वाचाल तर वाचाल "
गुरुवार... 23 एप्रिल 2026
" २३ - एप्रिल - वाचन संस्कृती दिन "
माझं शिर्षक गीत " वाचाल तर वाचाल "
पवित्र कुरआन म्हणतो ," वाचा , आणि तुमचा पालनकर्ता मोठा उदार आहे ,(३) ;
ज्याने लेखनी द्वारे तुम्हाला ज्ञान शिकवलै ,(४) ;.
मानवाला ते ज्ञान दिले जे तो जाणत नव्हता (५) ..
( " पारा नंबर:- ३० वा, सुराह नंबर ९६ सुराह अल - अलक आ.न.२- ते - ०५ )
प्रेषित मुहम्मद सल्लम ज्यावेळी चाळीसाव्या वर्षी अल्लाह ने पैगंबरी , प्रेषित, संदेश वाहक , मार्गदर्शक म्हणून घोषित केले, त्यावेळी हजरत मुहम्मद सल्लम हे " गार हिरा " मधे अल्लाह च्या उपासनेत( नामस्मरणात)तल्लीन होते , अचानक अल्लाह चे ईशदुत हजरत जिब्राईल ( जिब्राल्टर) अलै. येवून हजरत मुहम्मद स्व सल्लम यांना जोरात "आलिंगन" देऊन मिठी मारून
" इक्रा बिस्मिह रब्बुकूल लजी खलक" अर्थात:-
" वाचा ( पढ) ,वाच( पढ) पढ अपने रब्ब के नाम से जिसने पैदा किया '"
प्रेषित मुहम्मद सल्लम हे निरक्षर ( उम्मी) ,होते ... अल्लाह ने आपल्या ईशदुता मार्फत पवित्र कुरआन चे पहिली आयात" शिका - शिका - शिका " अर्थात; वाचा- वाचा- वाचा "
अरबांना शिक्षण नव्हते.. संपूर्ण अरब वाळवंट ठराविक लोकं च शिक्षीत होते .. म्हणून अल्लाहनेच त्याच दिवशी अंतिम प्रेषितत्व, पैंगंबरी , संदेश वाहक म्हणून घोषित केले...
तेथूनच शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून संपूर्ण आयुष्यात प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांनी मेहनत खर्चि केले.
प्रेषित मुहम्मद सल्लमांनी म्हणतात की," तुम्हाला ज्ञान ( शिक्षण) घेण्यासाठी चीन ला जाण्याची वेळ आली तरी जा "
त्याकाळी चीन ज्ञानाच्या बाबतीत जास्त प्रगत होता.
म्हणुनच म्हणतात की," वाचाल तर वाचाल"
लेखन:- डॉ सलीम सिकंदर शेख
बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर
९२७१६४००१४.
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015