logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

Aima midiya jan jan ki avaj Date 23.4.2026 pm 4:46 Pimpri : पिंपरी मेट्रो स्थानकापासून काळेवाडी फाट्यापर्यंत फीडर बससेवा; १० रुपयांत प्रवास या नवीन बस

Aima midiya jan jan ki avaj Date 23.4.2026 pm 4:46 Pimpri : पिंपरी मेट्रो स्थानकापासून काळेवाडी फाट्यापर्यंत फीडर बससेवा; १० रुपयांत प्रवास
या नवीन बसमार्गामुळे काळेवाडी, रहाटणी, विजयनगर, तापकीरनगर, श्रीनगर, धनगरबाबा वस्ती आणि ज्योतिबानगर यांसारख्या दाट लोकवस्तीच्या भागांना थेट मेट्रोजोडणी मिळाली आहे.
पिंपरी : पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी कनेक्टिव्हिटी सुलभ होण्याकरिता पुणे मेट्रो आणि पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडतर्फे (पीएमपीएमएल) पिंपरी मेट्रो स्थानकापासून काळेवाडी फाट्यापर्यंत फीडर बससेवा (पूरक सेवा) सुरू करण्यात आली आहे. या बसमुळे काळेवाडी, रहाटणी आणि पिंपरी पिंपरी मेट्रो स्थानकापासून काळेवाडी फाट्यापर्यंत फीडर बससेवा; १० रुपयांत प्रवास
या नवीन बसमार्गामुळे काळेवाडी, रहाटणी, विजयनगर, तापकीरनगर, श्रीनगर, धनगरबाबा वस्ती आणि ज्योतिबानगर यांसारख्या दाट लोकवस्तीच्या भागांना थेट मेट्रोजोडणी मिळाली
पिंपरी मेट्रो स्थानकाबाहेर प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज असलेली पीएमपीएमएल फीडर बस. एआयनिर्मित छायाचित्र
पिंपरी : पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी कनेक्टिव्हिटी सुलभ होण्याकरिता पुणे मेट्रो आणि पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडतर्फे (पीएमपीएमएल) पिंपरी मेट्रो स्थानकापासून काळेवाडी फाट्यापर्यंत फीडर बससेवा (पूरक सेवा) सुरू करण्यात आली आहे. या बसमुळे काळेवाडी, रहाटणी आणि पिंपरी परिसरातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

पुणे मेट्रोच्या प्रवाशांच्या सुविधेसाठी दहा मेट्रो स्थानकांवरून २३ मार्गांवर ८३ फीडर बस धावत आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी मेट्रो स्थानकापासून काळेवाडी फाट्यापर्यंत फीडर बससेवा सुरू करण्यात आली आहे. या नवीन बसमार्गामुळे काळेवाडी, रहाटणी, विजयनगर, तापकीरनगर, श्रीनगर, धनगरबाबा वस्ती आणि ज्योतिबानगर यांसारख्या दाट लोकवस्तीच्या भागांना थेट मेट्रोजोडणी मिळाली आहे. येथील प्रवाशांचा अवघ्या १० ते २० रुपयांत हा प्रवास पूर्ण होणार आहे.

गर्दीच्या वेळी १५ मिनिटांनी बस उपलब्ध
पिंपरी महापालिका मेट्रो स्थानक ते काळेवाडी फाटा या मार्गावर गर्दीच्या वेळी दर १५ मिनिटांनी आणि कमी गर्दीच्या वेळी दर ३० मिनिटांनी बस उपलब्ध असणार आहे. पहिली बस ही सकाळी साडेसहा वाजता पिंपरी मेट्रो स्थानकावरून आणि काळेवाडी फाटा येथून सकाळी सात वाजता सुटणार आहे. पिंपरीवरून शेवटची बस रात्री नऊ वाजता आणि काळेवाडी फाटा येथून रात्री साडेनऊ वाजता सुटणार आहे.प्रवाशांसाठी किमान भाडे १० रुपये आणि कमाल भाडे २० रुपये आहे. मेट्रो फीडर बससेवेमुळे काळेवाडी, रहाटणी, पिंपरी परिसरातील रहिवासी, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला थेट मेट्रो स्थानकापर्यंत स्वस्त आणि जलद प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. सध्या दहा मेट्रो स्थानकांसाठी ८३ फीडर बस २३ वेगवेगळ्या मार्गांवर सेवा देत आहेत, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

9
264 views

Comment