Aima midiya jan jan ki avaj Date 23.4.2026 pm4:41 सावधान! तुम्ही खाताय ते पनीर नसून बिनदुधाचा भलताच पदार्थ….पुणे : हॉटेलांमध्ये पनीरच्या नावाखाली चीज
Aima midiya jan jan ki avaj Date 23.4.2026 pm4:41 सावधान! तुम्ही खाताय ते पनीर नसून बिनदुधाचा भलताच पदार्थ….पुणे : हॉटेलांमध्ये पनीरच्या नावाखाली चीज अॅनालॉगचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. तसेच, विक्रेत्यांकडून चीज अॅनालॉगची पनीर म्हणून विक्री केली जात आहे. याबाबत ग्राहकांना कोणतीही माहिती न देता त्यांची फसवणूक होत आहे. या प्रकरणी कारवाई करण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. तसेच, ग्राहकांनी याबाबत दक्षता घेण्याचे आवाहनही केले आहे.पनीर हा केवळ दुधापासून बनविलेला पदार्थ आहे. याउलट डेअरी ॲनालॉग हा दूध व्यतिरिक्त इतर खाद्यतेल, स्टार्च, इगल्सिफायर व इतर घटक वापरून बनविलेला पदार्थ असून तो पनीरसारखा दिसतो. तो पनीर नसून, चीज अॅनालॉग या प्रवर्गात मोडतो. हॉटेलांमध्ये अन्न पदार्थ तयार करताना चीज अॅनालॉगचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाला आढळून आले आहे. मात्र, याची माहिती हॉटेलचालकांना दिली जात नाही. ग्राहकांची अशा प्रकारे फसवणूक होत असल्याच्या तक्रारी येत आहेत.
बाजारात काही विक्रेत्यांकडून चीज अॅनालॉग हे पनीर अथवा चीज म्हणून विकले जात आहे. यामुळेही ग्राहकांची दिशाभूल होत आहे, असे अन्न व औषध प्रशासनाने म्हटले आहे. अॅनालॉग हा आरोग्यास अपायकारक नाही, परंतु त्यातील घटक व पोषणमूल्ये पनीरपेक्षा वेगळी असतात. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी योग्य माहिती असणे आवश्यक आहे. तसेच, चीज अॅनालॉगचा उत्पादक अथवा पुरवठादाराने त्याच्या वेष्टनावर अन्नपदार्थाचे खरे स्वरूप स्पष्टपणे नमूद करावे, असेही अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.आहारात पनीरचे महत्व
भारत हा दुग्ध उत्पादनात अग्रगण्य देश असून पनीर हा भारतीय आहाराचा एक महत्त्वाचा घटक आहे. पनीर केवळ चविष्टच नाही तर पोषणामूल्यांनी समृध्द असल्यामुळे त्याचे आहारात विशेष स्थान आहे. पनीरमध्ये प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्वेचे आणि आवश्यक खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात. शाकाहारी लोकांसाठी पनीर हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो.
ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?
– पनीर खरेदी करताना पॅकबंद उत्पादनावरील माहिती काळजीपूर्वक वाचा.उत्पादनावरील अॅनालॉग असा उल्लेख आहे का ते तपासा.
– सुटे पनीर खरेदी करताना विक्रेत्याकडे ते शुद्ध दूधापासून बनलेले आहे का याची खात्री करा.
– संशय असल्यास विक्रेत्याकडे देयकाची मागणी करा.अन्न व्यवसायिकांना निर्देश
राज्यातील रेस्टॉरंट, केटरर्स, हॉटेल, फास्ट फूड विक्रेते, चीज अॅनालॉगचे उत्पादक, पनीरचे उत्पादक अथवा पुरवठादार यांनी चीज अॅनालॉग असा स्पष्ट उल्लेख करून ग्राहकांना त्याची माहिती द्यावी. या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास या आस्थापनांवर कठोर कारवाई घेण्यात येईल. हॉटेल, रेस्टॉरंटचालकांनी पनीर अॅनालॉग व चीज अॅनालॉग उत्पादकाकडून खरेदी करताना देयकावर या अन्नपदार्थाचा स्पष्टपणे उल्लेख असल्याची खात्री करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत.
अन्न व औषध प्रशासन ग्राहकांच्या आरोग्याबाबत दक्ष असून अन्नातील भेसळ व दिशाभूल करणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी कटिबध्द आहे. ग्राहकांनी अशा प्रकारची दिशाभूल झाल्यास त्याबाबत तक्रार प्रशासनाच्या