Aima midiya jan jan ki avaj Date 23.4.2026 PM4:35 # पाचवी, आठवी उत्तीर्णांनाही दहावीची परीक्षा देण्याची संधी, ऑनलाइन अर्जांसाठी २१ मेपर्यंत मुदत
पुणे
Aima midiya jan jan ki avaj Date 23.4.2026 PM4:35 # पाचवी, आठवी उत्तीर्णांनाही दहावीची परीक्षा देण्याची संधी, ऑनलाइन अर्जांसाठी २१ मेपर्यंत मुदत
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) जून-जुलैमध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना फॉर्म नंबर १७ भरून खासगीरित्या परीक्षा देता येणार आहे. त्यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना २१ मेपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत पाचवी किंवा आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीसाठी खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी करता येणार असल्याचे
पाचवी, आठवी उत्तीर्णांनाही दहावीची परीक्षा देण्याची संधी, ऑनलाइन अर्जांसाठी २१ मेपर्यंत मुदत
पाचवी किंवा आठवी उत्तीर्ण विद्यार्थीही आता थेट दहावीसाठी पात्र; ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च ने दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांना 'फॉर्म १७' भरण्याची संधी उपलब्ध करून दिली असून २१ AI Generated)
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) जून-जुलैमध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना फॉर्म नंबर १७ भरून खासगीरित्या परीक्षा देता येणार आहे. त्यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना २१ मेपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत पाचवी किंवा आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीसाठी खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी करता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी या बाबत परिपत्रकाद्वारे माहिती दिली. अनेक शाळाबाह्य विद्यार्थी पात्र असूनही मंडळाने दिलेल्या मुदतीत नोंदणी करून न शकल्याने संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून जून-जुलै २०२५च्या परीक्षांसाठी खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी करण्याची संधी देण्यात आली होती. त्यानुसार जून-जुलै २०२६मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी शाळाबाह्य खासगी विद्यार्थ्यांसाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये राज्य मंडळाच्या अटी-शर्तींनुसार नावनोंदणी करण्यासाठी उपलब्ध आहेत.
दहावी-बारावीच्या जून-जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. नावनोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या सध्याच्या पत्त्यातील जिल्हा, तालुका, निवडलेले माध्यम, शाखेनुसार शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांची यादी दिसेल. त्यातून एका शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाची निवड करावी लागेल. संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाने परीक्षा अर्ज, प्रकल्पाअंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अनुषंगिक मूल्यमान या बाबतची कार्यवाही करायची आहे. नोंदणी शुल्क ऑनलाइन भरल्यावर त्याबाबतची पावती विद्यार्थ्याच्या त्याच्या लॉगिनमध्ये उपलब्ध होणार आहे. खासगी विद्यार्थ्यांची नोंदणी नियमित शुल्कानेच केली जाणार आहे. त्यामुळे विलंब, अतिविलंब शुल्काची सुविधा उपलब्ध असणार नाही, तसेच नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.मूळ कागदपत्रे आवश्यक
विद्यार्थ्यांना नावनोंदणीसाठी https://mahahsscboard.in/ या संकेस्थळाचा वापर करावा लागणार आहे. नोंदणी करताना विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रे अपलोड करावी लागतील. काही कारणास्तव शाळा सोडल्याचा दाखला असल्यास त्याची मूळ प्रत जोडणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचा मोबाइल आणि ईमेल पुढील संपर्कासाठी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज, ऑनलाइन शुल्क भरल्याच्या पावतीची मुद्रित प्रत, मूळ कागदपत्रे नोंदणी अर्जावर नमूद केलेल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात दिलेल्या मुदतीत जमा करणे आवश्यक असल्याचे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.