logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

२८ हजारांची लाच घेताना कृषी पर्यवेक्षकास पकडले

धुळे : तालुक्यातील शिरुड येथील शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचन फाइल्स मंजूर करण्यासाठी २८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पिंप्री येथील कृषी पर्यवेक्षक कैलास रामदास तेले याला दि. २१ रोजी दुपारी शहरातील गजबजलेल्या जयहिंद चौकात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराची खांडबारा (जि. नंदुरबार) येथे ठिबक सिंचन साहित्य विक्रीची फर्म असून, दुसरी शाखा शिरुड येथे आहे. या दुकानातून शेतकरी शासकीय अनुदान योजनेंतर्गत साहित्य खरेदी करतात. या खरेदीची 'मोका तपासणी' करून फाइल्स मंडल अधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे काम कृषी पर्यवेक्षक कैलास तेले यांच्याकडे होते. हे काम करण्यासाठी तेले यांनी तक्रारदाराकडे ३५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी १० हजार रुपये त्यांनी आधीच घेतले होते.

उर्वरित रकमेसाठी तेले यांनी तगादा लावल्याने तक्रारदाराने २१ एप्रिल
धुळे एसीबी कार्यालयात नोंदवली. बुधवारी दुपारी एसीबीच्या तक्रार
जयहिंद चौकात दबा धरून बसलेल्या पथकाने, तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच कैलास तेलें (वय ४९) यांना पंचांसमक्ष ताब्यात घेतले. याप्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2
100 views

Comment