logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

धारावीतील एन शिवराज मैदानात ५५ वा वृक्ष संवर्धन दिन आणि स्वच्छता मोहीम संपन्न

धारावीतील एन शिवराज मैदानात ५५ वा वृक्ष संवर्धन दिन आणि स्वच्छता मोहीम संपन्न

मुंबई (दत्ता खंदारे )गेल्या अनेक वर्षापासून ज्या खेळाच्या मैदानाकडे दुर्लक्ष केले जात आहे.अशा धारावीतील एन शिवराजन मैदानात पूर्वीपेक्षा अधिक स्वच्छता हवी, या मागणीसाठी धारावी नागरिक समिती व झोपडपट्टी पोलीस पंचायत बीट नंबर दोन यांच्या माध्यमातून व जी उत्तर उद्यान विभाग तसेच घनकचरा यांच्या सहकार्याने बुधवार दिनांक २२ एप्रिल २०२६रोजी ५६ व्या जागतिक वृक्ष संवर्धन दिनी सकाळी आठ ते अकरा या वेळात मैदानाची स्वच्छता, वृक्षाभोवतीची झाडलोट, दगड मातीचा निचरा,वृक्षांना पाणी,खत तसेच श्री मयूर कांबळे यांच्या माध्यमातून हास्य योगा, नियमित व्यायाम अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभागातील ज्येष्ठ नागरिक महिला व युवक मंडळी सहभागी झाले होते.
संवर्धन दिनी आयोजित कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक घनकचरा विभाग श्री चंद्रकांत तांबे व कनिष्ठ वृक्ष अधिकारी श्रीमती स्वाती शेवडे यांच्यासह धारावी नागरिक समितीचे प्रमुख मार्गदर्शक दिलीप गाडेकर, अलका साबळे,संदीप ढवळे आणि कनिष्ठ पर्यवेक्षक श्रीमती निरंजना जगताप,मुकादम अशोक येवले व कामगार वर्ग उपस्थित होता. या सर्वांच्या सहकार्यामुळेच वृक्ष संवर्धन दिनाच्या स्वच्छतेचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी किरण खंदारे,अशोक काळे,मीना गौतम, श्री संजय सोनवणे व टीम यांचे सहकार्य लाभले.सदर खेळाच्या उद्यानात नियमावलीचा बोर्ड लावावा,कार्यक्रमानंतर आसपास परिसरातील साहित्य तातडीने उचलावे.दुसऱ्या दिवशी युद्ध पातळीवर स्वच्छता करावी. जे कोण मैदान वापरणार त्यांनीही स्वच्छतेची जबाबदारी घ्यावी अशी मागणी धारावी नागरिक समितीचे संपर्क सचिव श्री दिलीप गाडेकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
121 views

Comment