logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

गुळहळ्ळी गावची लेक बनली गावची पहिली महिला MBBS डॉक्टर"

दि २२ मुंबई (प्रतिनिधी-अंबादास गोरे)

सामान्य कुटुंबातील मुलीने जर मनात आणले, तर ती आभाळालाही गवसणी घालू शकते, हे धनश्री रंजना जगन्नाथ चेंडके हिने सिद्ध केले आहे. जिल्हा परिषद शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतलेल्या या कन्येने आज वैद्यकीय क्षेत्रातील MBBS पदवी मिळवून इतिहास घडवला आहे.

मुंबई सारख्या शहरात घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून देखील आई वडीलांचे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द धनश्रीला स्वस्थ बसु दिली नाही.

दि २१ रोजी लोकमान्य टिळक मुन्सिपल मेडीकल कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल सायन मुंबई यांच्या वतीने स्मृतीचिन्ह डिगरी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील गावाकडची अत्यंत गरिबीची परिस्थिती यातून आम्हाला शिकता आले नाही तू तरी खुप मोठी हो हे तिच्या आईचे वाक्य तिला स्वस्थ बसू देत नव्हते आज ती आईची इच्छा पूर्ण होत असल्याचे दिसून आले.

धनश्रीच्या या यशाने संपूर्ण राज्यात तिचे कौतुक होत आहे. एका गरीब आई वडिलांनी पाहिलेले 'डॉक्टर लेकीचे' स्वप्न आज सत्यात उतरले असून, संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे.

7
8161 views

Comment