जामखेड तालुक्यातील राजेवाडी (ए.जी.) परिसरातील 11 kV राजेवाडी शेतीपंप फीडर (33/11 kV खांडवी उपकेंद्र) वर सिंगल फेज वीजपुरवठा वारंवार खंडित होत ....
राजेवाडी (ता. जामखेड) येथे सिंगल फेज वीजपुरवठा खंडित; नागरिक त्रस्त, मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठपुरावा
अहिल्यानगर, :
जामखेड तालुक्यातील राजेवाडी (ए.जी.) परिसरातील 11 kV राजेवाडी शेतीपंप फीडर (33/11 kV खांडवी उपकेंद्र) वर सिंगल फेज वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या समस्येमुळे घरगुती वापर, शेतकऱ्यांचे दैनंदिन कामकाज तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठा परिणाम होत आहे. विशेषतः शेतवस्ती भागात अंधाराचे प्रमाण वाढल्याने चोरी व असुरक्षिततेची भीती वाढली असल्याचे नागरिकांनी सांगितले.
या संदर्भात यापूर्वी संबंधित वीज वितरण विभागाकडे तसेच मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार करूनही समस्या पूर्णतः सुटलेली नाही. काही दिवस सुधारणा झाल्यानंतर पुन्हा वीजपुरवठा खंडित होऊ लागल्याचे चित्र आहे.
पत्रकार रवी शिंदे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करत पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयाकडे लक्ष वेधले आहे. संबंधित विभागाने तात्काळ हस्तक्षेप करून:
सिंगल फेज वीजपुरवठा सुरळीत सुरू करावा
लोडशेडिंगमागील कारणे स्पष्ट करावीत
कायमस्वरूपी उपाययोजना करावी
अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, लवकरात लवकर प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.