logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

हडपसर–सासवड रोडवर डंपर पलटी; भेकराईनगरमध्ये वाहतूक कोंडी

पुणे : हडपसर–सासवड रोडवरील भेकराईनगर परिसरात आज दुपारी हायवा डंपर पलटी झाल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. अचानक घडलेल्या या अपघातामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
अपघातानंतर काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
घटनेची माहिती पत्रकार श्री.किशोर गायकवाड यांनी ट्रॅफिक पोलिस यांना दिली.वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून डंपर बाजूला करण्याचे आणि वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे हडपसर–सासवड मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

14
575 views

Comment