logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

कोंढाळी येथे तेजस्विनी व विठ्ठल रुख्मिणी ग्रामसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न....!


काटोल प्रतिनिधी:-
कोंढाळी (दि. २१ एप्रिल २०२६) – कोंढाळी सर्कल अंतर्गत आत्मनिर्भर प्रभाग संघात येणाऱ्या तेजस्विनी ग्रामसंघ व विठ्ठल रुख्मिणी ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन मंगळवारी गुलाब बाबा आश्रम येथे उत्साहात पार पडले.
सभेची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगर पंचायत कोंढाळीचे अध्यक्ष योगेश चापले, आत्मनिर्भर प्रभाग संघाच्या अध्यक्षा सरिता नेहारे तसेच सचिव सौ. पुष्पा रेवतकर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियान (उमेद) अंतर्गत काटोल ब्लॉक मिशन मॅनेजर दिनेश ढोके यांनी महिला बचत गटांच्या कार्याचे कौतुक करत ग्रामसंघांनी आर्थिक स्वावलंबनासाठी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. तसेच महिलांनी उद्योजकतेकडे वळावे यासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.
सभेत ग्रामसंघाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. बचत गटांचे उपक्रम, आर्थिक नियोजन तसेच आगामी वर्षातील विकास आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रस्तावना आत्मनिर्भर प्रभाग संघाचे प्रभाग समन्वयक नरेंद्र हेलोंडे यांनी केली. सभेचे आयोजन CTC उमेश्री इखार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अपर्णा धारपुरे, किरण गायकवाड व शुभांगी जाऊळकर यांनी विशेष सहकार्य केले.
सभेचा समारोप समाधानकारक वातावरणात करण्यात आला.

9
914 views

Comment