logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जामनेर तालुक्यात राष्ट्रवादी(श.प.) गटासह मविअला धक्का भाजपच्याच बालेकिल्यात शिंदेचे "ऑपरेशन टायगर"....!

जामनेरच्या विश्वजित पाटीलांचा असंख्य कार्यकर्ते व राष्ट्रवादी(श.प.) गटासह पदाधिकारी व युवा नेते यांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला
पाचोरा प्रतिनिधी
जिल्हाध्यक्ष किरण अशोक सुर्यवंशी
दि.२१/०४/२०२६(मंगळवार)
जामनेर तालुक्यातील तरुण नेतृत्व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे माजी युवक जिल्हाध्यक्ष विश्वजित मनोहर पाटील आणि त्यांचे वडील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे रावेर लोकसभा संपर्क प्रमुख डॉ.मनोहर पाटील यांनी असंख्य कर्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते शिवसेना पक्षात प्रवेश केला.
प्रसंगी ना.गुलाबराव पाटील,शिवसेना संपर्क प्रमुख आ.चंद्रकांत काते,शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा.समाधान महाजन,जामनेर तालुका प्रमुख ॲड.भरत पवार हे उपस्थित होते.
जामनेर विधानसभा मतदारसंघात १९९० पासुन ते आज तागायत विधानसभा निवडणुकीत सर्वात कमी मतांनी पराभुत असलेले डॉ.मनोहर पाटील आणि त्यांच्याच पाऊलावर पाऊल टाकत सामाजसेवेबरोबरच राजकारणाची जोड घेऊन नावारुपाला आलेले जामनेर तालुक्यातील तरुण नेतृत्व म्हणुन विश्वजित मनोहर पाटील हे नाव पुढे आले. कार्याच्या आणि वकृत्वाच्या बळावर राष्ट्रवादी-शरद पवार पक्षाने त्यांच्या युवक जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. जिल्हाध्यक्ष पद मिळाल्यानंतर तालुक्याबरोबरच जिल्ह्याभरात तरुणांची मोठी फौज यांच्या नेतृत्वात शरद पवार गटाला मिळाली. परंतु वैयक्तिक कारण पुढे करत विश्वजित पाटील यांनी कोणावरच टिका-टिपणी न करता पक्षाचे आभार मानुन आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा आणि प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा काही दिवसांपुर्वी दिला. त्यानंतर सर्वत्र शांतात पसरल्यानंतर त्यांनी अचानक शिवसेना पक्षात प्रवेश केल्याने तालुक्याला धक्काच बसला आहे.
जामनेर मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. ना.गिरिष महाजन हे अनेक दशकांपासुन या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करित आहे. आणि अशातच विश्वजित पाटील यांना हेरुन एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर केल्याची चर्चा तालुकाभरत सुरु आहे. कारण विश्वजित पाटील यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या प्रतिष्ठित चेहऱ्यांनी प्रवेश केला आहे त्यामुळे निश्चितच तालुक्यात शिवसेनेची ताकद तयार होऊन भाजपला अव्हान तर ठरणार नाही ना असाही प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
यावेळी विश्वजित पाटील यांच्या सोबत राष्ट्रवादी(श.प.) पक्षाचे डॉ.मनोहर पाटील(रावेर लोकसभा संपर्क प्रमुख),मयुर सुभाष पाटील-
(तालुका युवा अधिकारी, युवासेना-उबाठा, जामनेर),अरुण जानराव सावकारे (ता.कार्याध्यक्ष,सामाजिक न्याय विभाग, रा.कॉं.पा.-श.प.जामनेर),प्रविण कुमावत(पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते),विक्रम पंडीत घोंगडे
(शिवसेना(उबाठा) शहर प्रमुख,पहुर तथा ग्रा.प.सदस्य),कृष्णा चोरमारे
(उपतालुका प्रमुख, शिवसेना-उबाठा,जामनेर),विलास रघुनाथ मांडे(विभाग प्रमुख,शिवसेना,जामनेर),ईश्वर अनिल पाटील
(युवक ता.सरचिटणीस रा.कॉं.पा-शरदचंद्र पवार),राजेश चरणसिंग चव्हाण
(युवक ता.सरचिटणीस, रा.कॉं.पा-शरदचंद्र पवार),मोहन रामा जोशी (ता.चिटणीस,रा.कॉं.पा. -शरदचंद्र पवार),कार्तिक एकनाथ काळे(विद्यार्थी ता.सरचिटणीस, रा.कॉं.श.प.),राहुल अभिमन चौधरी(उपतालुका युवा अधिकारी,युवासेना-उबाठा ,जामनेर),सचिन शहाणे-
(मा.उपतालुका युवा अधिकारी,शिवसेना-उबाठा, जामनेर),हरिसिंग सिसोदिया
(ग्रा.पं.सदस्य,पिंपळगाव गो.),रविंद्र अमृत पाटील(ग्रा.पं.सदस्य,भराडी),भुषण जानकीराम चौधरी(हिंदुत्व प्रसारक),सुनिल भागवत पाटील(सामाजिक कार्यकर्ते),राहुल प्रभाकर पाटील(सामाजिक कार्यकर्ते),अरुण चंद्रा कोळी(सामाजिक कार्यकर्ते),पवन संजय पाटील(युवक शाखाध्यक्ष,रा.कॉं.पा.श.प,पळासखेडा प्र.न.),गणेश पाटील(शाखा प्रमुख,शिवसेना उबाठा,भराडी),मुकेश जाधव
(युवक शाखा प्रमुख),चंद्रकांत पाटील(युवासेना पं. स. गण प्रमुख), अभिजीत शेळके
(रा.युवक कॉंग्रेस तालुका कार्यकारणी सदस्य,जामनेर),पवन कैलास पाटील(शाखा अध्यक्ष रा.कॉं.पा.श.प., सवतखेडा),नारायण पंडीत इधाटे
(बुथ प्रमुख,रा.कॉं.पा.श.प सुनसगाव),अक्षय सोनार
(शिवसेना(उबाठा) शाखा प्रमुख,नाचणखेडा),रोशन समाधान धनगर
(युवासेना(उबाठा) उप तालुका संघटक),सुर्यकांत एकनाथ शिंदे
(सामाजिक कार्यकर्ते),मोहित देवरे
(सोशल मिडीया सल्लागार), शिवाजीराव साबळे(भारतीय जनता पार्टी- मा.शाखाध्यक्ष,पळासखेडा) या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी जाहिर पक्ष प्रवेश केला.
आ.चंद्रकांत पाटील आणि आ.किशोर पाटील,आ.अमोल पाटील,आ.चंद्रकांत सोनवणे, मा.खा.उन्मेश पाटील,छ.संभाजीनगर संपर्क प्रमुख विलास पारकर,युवासेना विभागीय सचिव अविष्कार भुसे,उत्तर महाराष्ट्र समन्वयक प्रथमेश पाटील,उत्तर महाराष्ट्र निरिक्षक किशोर भोसले यांनी फोनद्वारे संपर्क करुन अभिनंदन आणि स्वागत केले.

0
100 views

Comment