गोंडपिपरी तालुक्यात अपघाताची मालिका सुरुच.आत्ता पर्यंत तीन जन मृत्युमूखी.
चंद्रपूर: - जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात मागील काही दिवसात अपघात आणि हिंसक घटनांनी संपूर्ण तालुका हादरुन गेला असल्याचे दिसून येत आहे. वाहनांचा वेग, शाब्दिक राग,मनाचा सुटलेला ताबा आणि निष्काळजी अशा बेधुंद विचारांने अनेक निष्पाप जीव गेले असून अनेकांचे छोटेखानी संसार उध्वस्त झाले आहेत.
अशा दुर्देवी घटनांना धाबा या गावाशेजारील वेडगांव यागावापासून सुरु झाली. दहावीची परीक्षा दिलेला विद्यार्थी ओम धुडसे वय १५ वर्ष, हा मित्रासोबत फिरायला पहाटेला फिरायला गेला असता भरधाव बोलेरो पिकअप ने जोरदार धडक देऊन याचा जागीच जीव घेतला. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली.
दुसऱ्या दिवशी गोंडपिपरी कोठारी मार्गावर आक्सापूर जंगल मार्गावरील अपघातात चंद्रपूर वरुन उपचार घेऊन येत असलेल्या शिक्षकांच्या वाहनाला पिकअप गाडीने जोरदार धडक मारुन गणवीर नावाच्या शिक्षकांचा जागेवरच जीव गेला आणि तरुण मुलगा आणि मुलगी जबर जखमी झाले.दोघेही बहिण-भाऊ सध्या उपचार घेत असून मृत्यूशी झुंज देत आहेत.
ही घटना शांत व्हायच्या आधीच 19 एप्रिल रोजी गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथील शुल्लक कारणावरून वैभव साईनाथ आडे वय 20 वर्षे या तरुणाचा धारदार शस्त्र भोसकून खून करण्यात आला. दरम्यान गोंडपिपरी तालुक्यातीलच धामणगाव येथील चांगदेव बोमकंटीवार यांचा अपघातानंतर उपचार सुरु असतांना नागपूर येथे मृत्यू झाला.ही संपते ना संपते दि.20 एप्रिल रोजी गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथे श्री विठोबा बुटले या 55 वर्षिय इसमाला भरधाव कारने उडवून दिले. त्याचाही यामध्ये मृत्यू झाला. काही जन जखमी असल्याची माहितीही समोर आली आहे.
एकंरीत अपघाताची ही मालिका थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरलेले आहे.
ह्या अशा जीवघेण्या घटनांमुळे प्रवाशांसमोर प्रश्न निर्माण झाले आहेत. " रस्ते सुरक्षित का नाहीत? वाहकांचे वेगावर नियंत्रण का नाही? शुल्लक कारणावरून एखाद्याचा का घेतला जातो?मनुष्याचा जीव एवढा स्वस्त झाला आहे का? भामरागड-सुरजागड वरुन धावणारी वाहणे इतकी बेफाम का धावतात ? यावर आर.टी. ओ.कधी लगाम लावणार ?
सध्या पोलीस विभागाकडून कसून तपास सुरु असला तरी आरोपी अजून पर्यंत सापडलेले नाहीत.कदाचित आरोपी नक्कीच सापडतील, पण गेले जीव कधिच परत येणार नाहीत एवढे मात्र नक्की.