logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*उपोषणाचा इशारा! सेवानिवृत्त सैनिकावर हल्ला प्रकरणी योग्य कलमे न लावल्याचा आरोप , पोलिस स्टेशन समोर उपोषणाची तयारी*

*उपोषणाचा इशारा! सेवानिवृत्त सैनिकावर हल्ला प्रकरणी योग्य कलमे न लावल्याचा आरोप , पोलिस स्टेशन समोर उपोषणाची तयारी*

(गजानन ढाकुलकर) हिंगणा :

वानाडोंगरी येथे गोपाल तुकाराम ठाकरे यांच्यावर झालेल्या कथित हल्ला व लूटप्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले आहे. सुरुवातीला हा केवळ मारहाण व लूटप्रकरण मानले जात असताना, आता हा हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग होता का? असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, हल्ल्यापूर्वीच त्यांना धमक्या देण्यात आल्या होत्या आणि त्या संदर्भात संबंधित पोलिस ठाण्यात तक्रारही करण्यात आली होती.

मात्र, पूर्वी तक्रार देऊनही योग्य प्रतिबंधात्मक कारवाई झाली नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे जर वेळेत पोलिसांनी आवश्यक उपाययोजना केल्या असत्या, तर हा कथित हल्ला टाळता आला असता का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या घटनेत सोन्याची चैन, मोबाईल आणि चष्मा हिसकावून नेण्यात आल्याचा आरोप असून, सतीश भाऊराव शहाकार, सागर सतीश शहाकार, स्वप्नील सतीश शहाकार व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल असल्याचे सांगितले जात आहे.

कायदेतज्ज्ञांच्या मते, जर धमकीनंतर नियोजनपूर्वक हल्ला झाल्याचे तपासात स्पष्ट झाले, तर गुन्ह्याचे स्वरूप अधिक गंभीर मानले जाऊ शकते आणि कट रचणे, जीवितास धोका निर्माण करणे, जबरी चोरी, धमकी, सामूहिक हल्ला यांसारखी अधिक कठोर कलमे लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोपाल तुकाराम ठाकरे यांनी योग्य कलमे न लावल्यास पोलिस स्टेशनसमोर उपोषणाचा इशारा दिल्याने या प्रकरणाने राजकीय व सामाजिक तापमान वाढले आहे.

आता सर्वांचे लक्ष पोलिस तपास, सीसीटीव्ही पुरावे, पूर्वीच्या तक्रारी आणि धमकीच्या नोंदींकडे लागले असून, हा अचानक झालेला वाद होता की आखून केलेला हल्ला ? याचे उत्तर तपासातूनच स्पष्ट होणार आहे.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

3
36 views

Comment