logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

द रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल भंडारा ची शानदार यशाची झेप

द रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल भंडारा ची शानदार यशाची झेप

विलास केजरकर भंडारा.

भंडारा:- द रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल, भंडारा या शाळेने यंदाच्या AISSE ( इयत्ता दहावी) निकालाने आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे. या परीक्षेत कु. श्रावणी कांबळे हिने ९५.६ % गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, तर संकेत शहारे याने ९३.६% गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. आणि श्रेया मेश्राम हिने ९३.४% गुण प्राप्त करून तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. संकेत शहारे या विद्यार्थ्याने इंग्रजी या विषयात शंभर पैकी शंभर गुण प्राप्त करून एक विक्रम नोंदवला.
तसेच इतर गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये इफ्रा कुरेशी ९१%, रोहित मस्के ८९.४%, सिद्धेश गजभिये ८८.८%, यथार्थ पार्थी ८८.४% आणि खुशी साखरकर ८७% यांचा समावेश आहे.
या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यांचा मोठा वाटा असल्याचे द रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल नागपूर व भंडाराच्या अध्यक्षा डॉ. सौ. ज्योती अय्यर, द रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल नागपूर व भंडाराचे सचिव डॉ. श्री. सुरज अय्यर, द रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल नागपूर चे संचालक डॉ. नंदलाल चौधरी तसेच शाळेचे प्राचार्य श्री. अंकुश मुळे यांनी सांगितले. संस्था प्रशासनाने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना उज्वल भविष्यासाठी भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत.
यशस्वी झालेल्या विद्यार्थी- विद्यार्थिनींनी आपल्या यशाचे श्रेय द रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल नागपूर व भंडाराच्या अध्यक्षा डॉ. सौ. ज्योती अय्यर, द रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल नागपूर व भंडाराचे सचिव डॉ. श्री. सुरज अय्यर, द रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल नागपूर चे संचालक डॉ. नंदलाल चौधरी तसेच शाळेचे प्राचार्य श्री. अंकुश मुळे व शिक्षक - शिक्षिकांना दिले असून त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विशेष म्हणजे या शाळेची ही पहिली बॅच होती. त्यामुळे सर्वत्र शाळेचे कौतुक केल्या जात आहे.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
88 views

Comment