logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

इळेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सहात साजरी होणार

: इळेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी होणार
​मौजे इळेगाव (ता. भोकर): राष्ट्रनिर्माते, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती सोमवार, २७ एप्रिल २०२६ रोजी भोकर तालुक्यातील इळेगाव येथे अत्यंत उत्साहात आणि मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात येणार आहे.
​या महोत्सवासाठी गावात जय्यत तयारी सुरू असून, संपूर्ण परिसर निळ्या ध्वजांनी आणि आंबेडकरी विचारांच्या घोषणांनी दुमदुमून जाणार आहे. या दिवशी सकाळी ध्वजारोहण, त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक आणि सायंकाळी प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

​या जयंती उत्सवासाठी इळेगावसह परिसरातील बहुजन समाज आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी विविध सामाजिक उपक्रमही यावेळी राबवले जाणार आहेत.
​कार्यक्रमाची रूप रेषा :- प्रभोधनकार :- दादासाहेब शेळके. (भीमटायगर सेना राष्ट्रीय अध्येक्ष )यांचे व्याख्यान सायं. 7 वाजता या कार्यक्रमा चे अध्येक्ष :- ऍडव्होकेट सिद्धार्थ कदम (वंचित बहुजन आघाडी भोकर ) . प्रमुख उपस्थिती :- संजीव आणा सवई (शासकीय गु्तेदार ) ए एस जाधव (से. नि. प्रा.) विक्रम क्षीरसागर (सामाजिक कार्यकर्ते ) साहेबराव मोरे, जयभीम पाटील, अशोक डोंगरे, मिलिंद दादा गायकवाड (भीमटायगर सेना जि.अध्येक्ष ) राहुल सोनकांबळे, प्रतीक दादा कदम (भीमटायगर सेना ता. अध्येक्ष ) सुरज हणमंते, सुरेश जोंधळे, बाबुराव पाटील, बी आर पांचाळ (पत्रकार ) यशवंत क्षीरसागर, भीमराव वाघमारे, (सामाजिक कार्यकर्ते ) डी जी तुपसाखरे (सामाजिक कार्यकर्ते ) शुधांशु कांबळे (पत्रकार ) भीमशाहीर बाबुराव गाडेकर,( ऍडव्होकेट प्रशेणजित एडके) दिलीपराव, सुनील कांबळे संतोष डोंगरे मनोज शिंदे, डॉ. महेंद्र कांबळे बाबुराव सोनकांबळे (भा. बौ.म.स.भोकर ) सुनील उघडेराव (सामाजिक कार्यकर्ते )बुद्धिवंत उघडेराव ( युवा कार्यकर्ते ) प्रमुख पाहुणे :- बाबाराव जाधव पाटील (से. नि. मुख्यध्यापक )ब ळवंत हलगुंडे पाटील, पद्माकर हाडोळीकर (सारथी महाराष्ट्राचा न्यूज जि. प्रतिनिधी ) सुरज हणमंते (शिक्षक ) अतुल सिद्राम खंदारे, यशोदा मनोहर खंदारे, (पो. पा. इळेगाव ) परमेश्वर नरवाडे (महामंडळ भोकर ) एस. बी.पवार (ग्रामसेवक ) गौरजी कासे वाढ, (तलाठी ) एस. बी. खोट (जी. प मुख्याध्यापक ) सायंकाळी ठीक 8 वाजता
भीम बुद्धगीताचा कार्यक्रम होईल........ महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायिका (भीमशाहीर )आम्रपाली खराटे पुसदकर आणि त्यांचा संच, आणि दुसरे भीमशाहीर आवाजाचा बादशहा विकास राजा गायकवाड नांदेड आणि त्यांचा संच यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी भोकर शहराच्या परिसरातील सर्व आंबेडकर प्रेमी जनतेनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती सार्वजनिक भीम जयंती मंडळ इळेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे

2
556 views

Comment