logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

​जनता विद्यालयात शैक्षणिक आढावा बैठक उत्साहात संपन्न


​पिंपळगाव सराई /बुलढाणा / महाराष्ट्र (प्रतिनिधी): .

येथील जनता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव सराई येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या वार्षिक कामकाजाचा विस्तृत आढावा घेण्यासाठी आयोजित केलेली विशेष बैठक सोमवार, २० एप्रिल रोजी अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीचे संचालक सुनीभाऊ लाहोटी होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. रामकृष्णदादा शेटे, सचिव मा.प्रेमराजजी भाला, कोषाध्यक्ष मा. विजयजी कोठारी, संचालक मा.संतोषअप्पा खबुतरे, सल्लागार मा. सुभाषजी बारस्कर,मा.मदनाना गवते, सदाशिव शिंदे, भावसिंग सोळंकी, शेषरावबाबा गायकवाड तसेच शाळा निरीक्षण समिती चे अध्यक्ष सुभाषजी फटिंग, भालेराव, माजी प्राचार्य जावळे या मान्यवरांच्या उपस्थितीने कर्मचाऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता.
​कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, विद्याभारती वंदना आणि मधुर स्वागत गीताने करण्यात आली. मान्यवरांचे स्वागत भारतीय परंपरेनुसार रुमाल व गुलाब पुष्प देऊन सन्मानपूर्वक करण्यात आले. प्रास्ताविक करताना प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी वर्षभरातील शैक्षणिक प्रगती, सहशालेय उपक्रम आणि SQAAF मधील विद्यालयाची यशस्वी वाटचाल यावर प्रकाश टाकला.
​बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना सुनिलभाऊ लाहोटी यांनी सर्व कर्मचारी उपस्थित असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, "जेव्हा सर्व घटक एकत्र येतात, तेव्हाच संस्थेची प्रगती वेगाने होते. तुमच्या सर्वांच्या सामूहिक कष्टामुळेच विद्यालयाचा लौकिक वाढत आहे."
​प्रमुख मार्गदर्शन करतानाशिक्षण प्रसारक मंडळ चिखलीचे सचिव प्रेमराजजी भाला यांनी प्रत्येक विभागाच्या अहवालाचे कौतुक केले.त्यांनी प्रत्येक अहवालाचे सूक्ष्म निरीक्षण करून अहवाल सादरीकरणाबाबत खालील प्रमाणे आपले मत मांडले.

व्यापक आढावा"सर्व शिक्षक आणि प्राध्यापकांनी आपल्या विभागाचा वार्षिक अहवाल अत्यंत सूक्ष्म आणि आकडेवारीसह सादर केला, ज्यातून त्यांच्या वर्षभराच्या परिश्रमाचे दर्शन घडले."

नियोजनबद्धता: "प्रत्येक अहवालात केवळ कामाचा आढावाच नव्हता, तर विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी राबवलेल्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले."

​गुणवत्तेची साक्ष: "SQAAF आणि सहशालेय उपक्रमांनुसार तयार केलेले हे अहवाल आपल्या शाळेच्या उंचावलेल्या शैक्षणिक गुणवत्तेची साक्ष देतात."

​उत्कृष्ट सादरीकरण: "अतिशय मुद्देसूद मांडणी, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण आणि भविष्यकालीन उद्दिष्टांचा स्पष्ट आराखडा यामुळे सर्वच अहवाल स्तुत्य ठरले." त्याच प्रमाणे त्यांनी आगामी शैक्षणिक वर्षात गुणवत्ता वाढीसाठी कोणते नवे प्रयोग करता येतील, यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

शाळा सल्लागार मदननाना गवते यांनी विद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करून विद्यालयाने विविध क्षेत्रात सन्मान वाढविल्याबद्दल सर्व संचालक, प्राचार्य, उपक्रमशील शिक्षक यांचा विशेष सत्कार केला.
​बैठकीसाठी प्राथमिक,माध्यमिक विभागाचे शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देविदास दळवी यांनी त्यांच्या प्रभावी शैलीत केले, तर उपस्थितांचे आभार जनता प्राथमिक च्या मुख्याध्यापिका सौ. खुर्दे मॅडम यांनी मानले. पर्यवेक्षक संजय पिवटे सर्व शिक्षक व कर्मचारी बंधू-भगिनींनी ही आढावा बैठक यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

​या बैठकीच्या शेवटी, येणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षात अधिक जोमाने आणि कल्पकतेने काम करण्याचा निर्धार सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.

19
665 views

Comment