logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

आईच्या हस्ते कवी संजय गायकवाड यांच्या काव्यसंग्रहांचे प्रकाशन

आईच्या हस्ते कवी संजय गायकवाड यांच्या काव्यसंग्रहांचे प्रकाशन
पिंपरी, प्रतिनिधी : उमेश पाटील 8530664576
कवी संजय एकनाथ गायकवाड यांच्या ‘अंधारावर सूर्य गोंदला’ आणि ‘सूर्यांधकारात माणूस’ या काव्यसंग्रहांच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन त्यांच्या मातोश्री विमल गायकवाड यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात आयोजित या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रा. श्रीकृष्ण अडसूळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विश्वास वसेकर, रजत प्रकाशनचे अशोक कुमठेकर, नगरसेविका तृप्ती कांबळे, दीप्ती कांबळे यांच्यासह रोहिणीताई गायकवाड, अशोक गायकवाड, राजेंद्र गायकवाड, मुखपृष्ठकार अनिल जोशी, दिलीप कुमठेकर, अभियंता विजय मानकर, चंद्रकांत चाबुकस्वार आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. विश्वास वसेकर यांनी गायकवाड यांच्या कवितेचे कौतुक करताना ती सामाजिक बांधिलकी जपणारी आणि दीर्घकाळ टिकणारी असल्याचे सांगितले. तसेच कवितेत आईचे स्थान अधोरेखित करत, आईच्या हस्ते प्रकाशन होणे ही विशेष बाब असल्याचे नमूद केले.
विमल गायकवाड यांनी भावनिक शब्दांत आपल्या मुलाच्या कर्तृत्वाचा अभिमान व्यक्त करत, “मुलं हीच माझी खरी संपत्ती आहे,” असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. श्रीकृष्ण अडसूळ यांनी गायकवाड यांच्या कवितेतील साधेपणा, चिंतनशीलता आणि सामाजिक भान अधोरेखित केले. “गिरणी कामगाराच्या मुलाने कवी म्हणून उभे राहणे ही मोठी बाब आहे,” असे ते म्हणाले.
स्वतः कवी संजय गायकवाड यांनी आई-वडिलांच्या संस्कारांचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करत, “ज्ञानाच्या बळावर अंधारावर मात करता येते,” असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशिष गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन मंजिरी तिक्का यांनी, तर आभार प्रदर्शन मीनल देशपांडे यांनी केले.

6
148 views

Comment