logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत मागितलेली माहिती वेळेत न दिल्याप्रकरणी औंदाणे (ता.बागलाण) येथील तत्कालीन ग्रामसेवक यांच्यावर दहा हजार दंडाची कारवाई

कोल्हापूर : प्रतिनिधी ( सुरेश जाधव ) : 21 एप्रिल 26
मिळालेल्या माहितीनुसार, सटाणा येथील संजय कन्हैयालाल पाठक यांनी २१ जून २०२२ रोजी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या कलम १९(३) अन्वये द्वितीय अपील दाखल केले होते. औंदाणे ( बागलाण ), सटाणा, जि. नाशिक येथील ग्रामपंचायत हद्दीतील यशवंतनगर परिसरातील पाठक मोटर्स शोरूमच्या पश्चिमेकडे टाकण्यात आलेल्या पाइपलाइन संदर्भात ग्रामपंचायतीचा ठराव, जागा मालकाची संमती, निधी मंजुरी व जाहिरातीची प्रत, अशी माहिती मागविण्यात आली होती.
या प्रकरणाची सुनावणी १२ फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडली होती. अर्जदाराने माहिती घेण्यास नकार दिल्याचा कोणताही ठोस पुरावा सादर करण्यात आला नसल्याचे आयोगाने
निरिक्षण नोंदविले असून निर्धारीत वेळेत माहिती न दिल्याने राज्य माहितीआयोग, खंडपीठ नाशिक येथील राज्य माहिती आयुक्त भूपेंद्र गुरव यांनी दंडाचाआदेश दिला.
आयोगाने संबंधित ग्रामसेवक वाय. आर.सूर्यवंशी यांना कारणे दाखवा नोटीस बजावत १५ दिवसांत खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार त्यांनी २ जुलै २०२५ रोजी सादर केलेल्या खुलाशात माहिती देण्याचा प्रयत्न केला होता, त्यामध्ये अर्जदाराने माहिती स्वीकारण्यास नकार दिल्याचा दावा केला होता. मात्र सदरील खुलासा अपुरा व असमर्थनीय ठरवून सबंधित ग्रामसेवक व जन माहिती अधिकारी यांनी सादर केलेला पुरावा ठोस नसल्याचे नमूद करून माहितीचा अधिकार अधिनियमातील कलम 7 (1) अन्वये निर्धारित वेळेत माहिती पुरविले नसल्याचे स्पष्ट झाल्याने व संबधित अधिकाऱ्याने कायद्याचे उल्लंघन केल्याने सदरील कारवाई करण्यात आली आहे.

1
10 views

Comment