काटोल अर्जुन नगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंतीचा कार्यक्रम संपन्न*
काटोल प्रतिनिधी :-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती अर्जुन नगर काटोल, जि. नागपूर महाराष्ट्र शाहीर परिषद शाखा काटोल, व भारत सांस्कृतिक मंडळ काटोल यांच्या संयुक्त विद्यमाने अर्जुन नगर येथील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ दि. १४/४/२०२६ रोज मंगळवारला ठीक ११:००वा डॉ. आंबेडकर यांची १३५ वी जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती मा. सौ. अर्चनाताई देशमुख अध्यक्ष नगर परिषद काटोल मा. श्री. सुभाष कोठे सभापती न. प. काटोल मा. सौ. शकूनताई मडावी सदस्य न. प. काटोल मा. लताताई कडू उपसभापती महिला बालकल्याण न. प. काटोल मा. प्रभाकर ढोके अध्यक्ष स्मारक समिती, मा. तानबा सिंगारे सचिव स्मारक समिती यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. श्री. प्रभाकर ढोके, मा. श्री. तानबा सिंगारे यांनी मार्गदर्शन करून प्रकाश टाकला मा. सौ. अर्चनाताई देशमुख अध्यक्ष न. प. काटोल यांनी सविस्तर मार्गदर्शन करतांना सांगितले कि डॉ. आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानावर देशाचा कार्यभार चालतो. डॉ. आंबेडकर हे देशाचे कायदेमंत्री असताना १९५२ ला नेहरू मंत्रिमंडळात संसदेत हिंदू कोड बिल सादर केले होते. सामाजिक शैक्षणिक आर्थिक राजकीय वडिलांच्या संपत्तीत समान हक्क हे सर्व काही मिळाले. ग्रामपंचायती पासून ते लोकसभेपर्यंत महिला विविध पदावर दिसत आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घराघरात गेले पाहिजे ही काळाची गरज आहे.या प्रसंगी शशिकला सिंगारे व त्यांचा संच यांनी गीत गायनाचे माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पटवून सांगितले. उपस्थित विठ्ठलराव वानखेडे तुकाराम शृंगारे भाऊराव ढोणे, कमल किशोर वानखेडे प्रमोदराव तायडे, विनायकराव ढोणे खुशाल धवराळ,प्रल्हाद गजभिये,दादाराव नाईक बबन वानखेडे, रुपेश्री तायडे, भाग्यश्री आखरे, लिलाबाई देशभ्रतार मंदा शृंगारे द्रौपदी ढोके,ताई वानखेडे दुर्गा वानखेडे, वैशाली वानखेडे, करुणा गजभिये, लीला ढोके,शांता पारवे सुनीता तिडके, सुनीता भुजाडे संचालन भाऊराव ढोणे प्रास्ताविक तुकाराम शृंगारे आभार रितेशकुमार सिंगारे यांनी मानले तेव्हा महिला पुरुष व बालकलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.