logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

भुसावळ येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन उत्साहात साजरी

*भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी साई नगर, भुसावळ येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन उत्साहात साजरी*

The Buddhist society of India तथा भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉ राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वात जळगाव जिल्हा कमिटीच्या अंतर्गत जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी समतावादी महापुरुषांच्या विचारधारेवर आधारित प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन त्यामध्ये महापुरुषांच्या प्रतिमांना रंग भरा स्पर्धा, प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा, तसेच मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देऊन "ज्ञान दिवस" साजरा करण्यात आला.

नवीन पिढीला आपल्या सर्व महापुरुषांच्या कार्याची माहिती होऊन ते विचार त्यांच्या मनामध्ये रुजवण्याच्या उद्देशाने भारतीय बौद्ध महासभा जळगाव जिल्हा अध्यक्ष मा. प्रमिलाताई किशोर भालेराव यांच्या मार्गदर्शनात आणि अध्यक्षतेखाली मा.सुरेखाताई सतिश तायडे भुसावळ शहर अध्यक्ष यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.मा.मालिनीताई चुडामण तायडे यांच्या सहकार्याने मालिनी ताई यांच्या टिवशन क्लासेस ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमांना रंग भरा स्पर्धा , प्रश्नमंजुषा,निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सर्व स्तरातील विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र तसेच खाऊ वाटप करून गौरवण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा मालिनी ताई चुडामण तायडे यांचे सहकार्य लाभले.सदर प्रसंगी मा. किशोर भालेराव डॉ भिमराव रामजी आंबेडकर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी AMSC बँक चे राज्य कोषाध्यक्ष,मा.मनिष साबळे AMSC बँक चे जळगाव जिल्हा अध्यक्ष तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी मा ‌.प्रमिला किशोर भालेराव जळगाव जिल्हा अध्यक्ष,मा. सुरेखा सतीश तायडे भुसावळ शहराध्यक्ष, मा. प्रमिला संजय गुरचळ भुसावळ तालुका सचिव,मा. कीर्ती मनीष साबळे भुसावळ तालुका कोषाध्यक्ष,मा. प्राची प्रकाश शेळके भुसावळ शहर संघटिका,मा. मालिनी चुडामण तायडे यांची उपस्थितीती होती. कार्यक्रम यशस्वीरित्या उत्साहात संपन्न झाला.
आयु.सुरेखाताई सतिश तायडे
भुसावळ शहर अध्यक्ष
The Buddhist society of India
तथा भारतीय बौद्ध महासभा
जयप्रकाश शुक्ला
All india media association

8
26 views

Comment