* निझर्णेश्वर मंदिर प्रमुख पर्यटन केंद्र होणार- पालकमंत्री डॉ.विखे पाटील*
* निझर्णेश्वर मंदिर प्रमुख पर्यटन केंद्र होणार- पालकमंत्री डॉ.विखे पाटील*
शिर्डी (*शिवप्रहार न्यूज नेटवर्क*)याबाबत अधिक माहिती अशी की,श्रीक्षेत्र निझर्णेश्वर मंदिराचा सुरू झालेला जीर्णोद्धार व परिसरात प्रस्तावित बिबट सफारी प्रकल्प यामुळे हे देवस्थान तालुक्यातील प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून विकसित होईल असा विश्वास जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
श्रीक्षेत्र निझर्णेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी आमदार अमोल खताळ, तहसीलदार धीरज मांजरे,पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे,वनविभागाचे अधिकारी अमरजित पवार,प्रवरा बँकेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र थेटे,कैलास तांबे तसेच मंदिर विश्वस्त समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले की,मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही.मात्र या कामात लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा आहे.वनविभागाच्या जागेवर प्रस्तावित बिबट सफारी प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला असून राजस्थानमधील व्याघ्र प्रकल्पांच्या धर्तीवर हा प्रकल्प राबविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या प्रकल्पामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊन स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत असेही त्यांनी नमूद केले.
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015