logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

टिटवाळ्यात पाच कोटींचा एमडी साठा जप्त!! महिला पुरवठादार अटकेत

साजिद शेख शहापूर ठाणे जिल्हा प्रतिनिधी
एखाद्या चित्रपट पटकथेलाही लाजवेल असा प्रकार गुन्हेगारी दुनियेत घडत होता. चित्रपटांमध्ये आपण ड्रग्जच्या तस्करीच्या घटना पाहिल्या आहेत. सिनेमांमध्ये ड्रग्जची तस्करी कशी होते, ते किती रुपयांची असतात, तस्करांच्या विरोधात कारवाई कशी होते? ते आपण पाहिलं आहे. पण वास्तविक आयुष्यातही अशाप्रकारच्या घटना सर्रासपणे सुरु असतात हे आता उघडपणे बघायला मिळत आहे. मुंबईत गोरेगावच्या नेस्को सेंटर येथे अंमली पदार्थांच्या सेवनामुळे दोन विद्यार्थी दगावली. यानंतर या ड्रग्ज तस्करीच्या काळ्या दुनियेवर संपूर्ण जगाचं लक्ष गेलं. मुंबईतील घटनेनंतर अंमली पदार्थ विरोधी पथक आणि पोलिसांनी कारवाई कडक केली आणि ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले. विशेष म्हणजे पोलिसांनी या प्रकरणी टिटवाळ्यात खूप मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल 6 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. महिला ड्रग्ज सप्लायरच्या घरात हा सगळा साठा सापडला. या महिलेबाबातची संपूर्ण माहिती समोर आली आहे मुंबईच्या गोरेगाव नेस्को सेंटर येथील कॉन्सर्टमध्ये जो प्रकार उघडकीस आला त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ड्रग्जच्या सेवनामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अंमली पदार्थांच्या तस्करी आणि विक्रीविरोधात जोरदार कारवाई सुरु आहे. अशीच कारवाई करत असताना पोलीस एका हायप्रोफाईल सोसायटीत पोहोचले. इथे एका फ्लॅटमध्ये पोलिसांना तब्बल 5 हजार एक्टेंसीच्या गोळ्या मिळाल्या. या गोळ्यांची किंमत तब्बल 6 कोटी आहे. अश्विनी पॉल नावाच्या महिलेच्या घरात या सर्व गोळ्या सापडल्या. पोलिसांनी या महिलेला अटक केली. पोलिसांनी या प्रकरणात खोलवर तपास केला असता अश्विनी पॉल या महिलेबाबत धक्कादायक माहिती समोर आली. अश्विनी पॉल आणि तिचा नवरा हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची माहिती समोर आली. अश्विनी पॉलच्या घरातून चार ते पाच मोबाईल फोन आणि आठ सीम कार्ड जप्त करण्यात आले आहेत.विशेष म्हणजे एखाद्या सिनेमालाही लाजवेल असा प्रकार या ड्रग्जच्या व्यवसायात सुरु होता. कारण टिटवाळ्यात पोलिसांच्या छाप्यात सापडलेल्या 5 हजार एक्स्टेंसीच्या गोळ्यांपैकी काही गोळ्यांवर 'मर्सिडीज' असा उल्लेख आहे. तर नेस्कोच्या प्रकरणातील आरोपी विनीत गेरेलानी याच्या घरातून ज्या एक्स्टेंसीच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या त्यांच्यावर 'मर्सिडीज' असा उल्लेख आहे, अशीदेखील माहिती आहे. त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये प्रकरणांचा काही संबंध आहे का? याचादेखील अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून शोध सुरु आहे.अंमली पदार्थ विरोधीच्या घाटकोपर युनिटने साकिनाका येथून इरफान अन्सारी याला एक्स्टेंसीच्या गोळ्यासह ताब्यात घेतलं. त्याच्या चौकशीतून अश्विनी पॉलचं नाव समोर आलं. यानंतर पोलीस अश्विनी पॉलच्या टिटवाळा येथील घरी पोहोचले. त्यांनी तिच्या घरावर अचानक छापा टाकला. या छाप्यात अश्विनी पॉलच्या घरात 5 हजार एक्स्टेंसीच्या गोळ्या सापडल्या. विशेष म्हणजे पोलिसांनी इरफान अन्सारी याला ड्रग्ज पुरणारा आरोपी सोफियान यालादेखील अटक केली आहे. त्याच्या चौकशीतून पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली.
पोलिसांनी पाळत ठेवून छापा टाकला
अश्विनी पॉल ही सुफियान नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होती. आरोपी इरफान आणि अश्विनी यांच्यातील दुवा म्हणून सोफियान काम करायचा. अश्विनी ही टिटवाळ्यातील एका हायप्रोफाईल सोसायटीत सध्या राहत होती. फियानला बेड्या ठोकल्यानंतर सोफियानची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लगेच तिच्या घरावर छापा टाकला नाही. तर आधी पोलिसांनी तिच्या घरावर पाळत ठेवली. यानंतर संधी मिळताच पोलिसांनी तिच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात तिच्या घरात 5 हजार एक्स्टीसीच्या गोळ्या आढळल्या. विशेष म्हणजे अंमली पदार्थांचा इतका मोठा साठा अश्विनी पॉलच्या घरात सापडेल, असा पोलिसांना अंदाज नव्हता. तर तिलादेखील आपल्या घरी पोलीस छापा टाकतील, असं वाटलं नव्हतं. अश्विनी पॉली सध्या अमली पदार्थाची तस्करी करत होती पोलिसांनी तिचा इतिहास शोधून काढला असता पूर्वी ती डान्सबार मध्ये बार बाला म्हणून काम करत होती बारबालाचे काम सोडल्यानंतर ती ड्रग्स तस्करी म्हणून काम करू लागली अश्विनी बोल चे दोन लग्न झाल्याची माहिती समोर आली आहे तिच्या पतीची ही पार्श्वभूमी गुन्हेगार स्वरूपाची होती अश्विनी पोलीस की शादी होती की ती दर दोन-तीन महिन्याने घर बदलत असे.

1
0 views

Comment