logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

मध्य रेल्वेची सेवा खोळंबली डोंबिवली मध्ये रेल्वे स्थानकातच लोकल ट्रेन चा डब्बा रुळावरून घसरला आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल

साजिद शेख शहापूर/ ठाणे जिल्हा प्रतिनिधी
मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल सेवा आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज सोमवारी विस्कळीत झाली आहे. डोंबिवली स्थानकात लोकलचा एक डबा रुळावरून घसरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याचा मोठा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीला बसला आहे. विशेषतः कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या मार्गावरील वाहतूक सध्या ठप्प झाली असून, कामावर निघण्यासाठी घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. कोपर आणि ठाकुर्ली स्थानकातील धीम्या मार्गावरील वाहतूक रविवारी फलाट रुंदीकरणासाठी बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले असताना आठवड्याचा पहिलाच दिवस रेल्वे प्रवाशासाठी डोकेदुखीचा ठरला. सकाळी ८.३० वाजताची कल्याणच्या दिशेने जाणारी लोकल डोंबिवली स्थानकातून मार्गस्थ होत असतानाच घसरली. यामुळे डोंबिवली पुढील प्रवासाचा खोळंबा झाला. या लोकलच्या मागे असलेल्या डोंबिवली ते दिवा दरम्यानच्या चार लोकल डोंबिवली स्थानकातून पुन्हा मुंबईच्या दिशेने वळवण्यात आल्या असून मागील तासभरापासून लोकल सेवा ठप्प आहे. कोपर, ठाकुर्लीला एकही ट्रेन थांबणार नाही
मुंबईकडून कल्याणच्या दिशेने जाणारी सकाळी ८.३० वाजताची लोकलचे दोन डबे डोंबिवली स्थानकात घसरले. यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून कल्याण कडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकलचे वेळापत्रक कोलमडले आहे. दरम्यान कोपर आणि ठाकुर्ली दरम्यान पुढील काही काळ एकही लोकल थांबणार नसून प्रवाशांनी डोंबिवली स्थानकातून जलद लोकलने प्रवास करावा, कल्याण ते दिवा दरम्यान सर्व लोकल जलद मार्गावरून चालवल्या जात असल्याची उद्घोषणा रेल्वे प्र्शास्स्नाक्डून केली जात आहे.या अपघातामुळे केवळ कल्याणकडे जाणारी वाहतूकच नाही, तर सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या धिम्या गाड्यांवरही लवकरच परिणाम होण्याची शक्यता आहे. जर ही समस्या वेळेत सुटली नाही, तर सकाळी १०:२५ ची कल्याण ते सीएसएमटी ही एसी लोकल रद्द किंवा प्रभावित होऊ शकते. सध्या जलद मार्गावरील गाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली आहे.

7
506 views

Comment