logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जवळपास सर्वच वर्तमानपत्रांनी आज महिला आरक्षण विधेयक नामंजूर अशी पहिल्या पानावर हेडलाइन दिली आहे, फक्त ‘द हिंदू’ वगळता. ‘द हिंदू’मध्ये मात्र असे म्हटले

*जवळपास सर्वच वर्तमानपत्रांनी आज महिला आरक्षण विधेयक नामंजूर अशी पहिल्या पानावर हेडलाइन दिली आहे, फक्त ‘द हिंदू’ वगळता. ‘द हिंदू’मध्ये मात्र असे म्हटले आहे की संवैधानिक सुधारणा (Constitutional Amendment) विधेयक नामंजूर. खरी बातमी हीच होती*

*बाकी गेल्या १२ वर्षांपासून माध्यमे खोटे पेरण्याचे काम यशस्वीरित्या अविरत करत आहेत, यात दुमत नाही. मुळात सरकार महिला आरक्षणाच्या नावाखाली दिलीमिटेशन म्हणजेच लोकसभेतील जागांची पुनर्रचना करणार होते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, लोकसभेच्या जागा ५४३ वरून ८५० पर्यंत वाढणार होत्या*

*लोक थोडी शहाणी झाली आहेत. गेल्या बारा वर्षांत जे पेरले गेले, ते आता उगवत आहे.सरकारबद्दल नाराजी वाढत आहे*

*खासदारांची संख्या २४० वर आली असून, बहुमत असणारे सरकार हे इतर पक्षांच्या साहाय्याने चालत आहे. हे असेच सुरू राहिले तर येणाऱ्या निवडणुका जिंकणे कठीण आहे. त्यावर उपाय म्हणून लोकसभेतील जागा वाढवणे, मतदारसंघांची पुनर्रचना करणे आणि आपल्याला हवे तसे मतदारसंघ रचणे, यासाठीच ही घटनादुरुस्ती होती*

*उत्तर भारतात लोकसंख्या भरमसाट वाढली आहे. सगळ्याच बाबतीत, गायपट्टा मागास आहे. गेल्या १२ वर्षांत भारतीय जनता पार्टीने हिंदू-मुस्लिम अजेंडा वापरून आणि दबावाचे राजकारण करून आपले वर्चस्व इथे निर्माण केले आहे. तर मुळात इथेच डीलीमिटेशन करून लोकसभेच्या जागा वाढवत, येणाऱ्या निवडणुका जिंकून सत्तेचा अमरपट्टा गळ्यात घालण्याचा केविलवाणा प्रयत्न मोदी सरकार ने केला*

*दक्षिणेत लोक पुरोगामी विचारसरणीचे आहेत. लोकसंख्या नियंत्रण, शिक्षण, रोजगार आणि विकास यात ते अग्रेसर आहेत. त्याच फळ म्हणून त्यांना लोकसभेत जागा कमी मिळतील, असं नाही तर भारतीय जनता पार्टी दक्षिणेत जागा जिंकत नाही म्हणून तिथे जागा वाढवण्यात आल्या नाहीत*

*या सगळ्यात महाराष्ट्र आणि इथले राजकारणी कुठेच दिसले नाहीत. एकेकाळी “दिल्लीचे तख्त राखतो, महाराष्ट्र माझा” असे म्हणणारे आम्ही, आज महाराष्ट्राची स्थिती दिल्लीसमोर झुकलेली आहे. मुळात अशा वेळी आपली बाजू भक्कमपणे मांडणे गरजेचे होते, मात्र तसे होताना दिसले नाही*

*महाराष्ट्रातील नेते चिडीचूप होते आहेत आणि राहतील*
*बाकी पाच राज्यांच्या निवडणुका असताना विशेष अधिवेशन बोलावून, महिला आरक्षणाच्या नावाखाली घटनादुरुस्ती विधेयक आणण्याचे कारण काय असेल? ७.४५ ला मतदान झाले, विधेयक पडले आणि ८ वाजता भारतीय जनता पार्टीच्या खासदारांच्या हातात विरोधी पक्षाविरुद्ध बॅनर होते. संसदेत आंदोलन चालू होते. किती फास्ट आहे सगळं! संसदेत १५ मिनिटांत बॅनर पोहोचले की आधीच सगळी स्क्रिप्ट लिहिली होती?*

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
347 views

Comment