*वानाडोंगरीत कुलर चोरी, CCTV मध्ये चोर कैद… तरीही पोलिस निष्क्रिय ? नागरिकांत संताप*!
*वानाडोंगरीत कुलर चोरी, CCTV मध्ये चोर कैद… तरीही पोलिस निष्क्रिय ? नागरिकांत संताप*!
(गजानन ढाकुलकर) वानाडोंगरी : महालक्ष्मी एन्टप्राइजेस, वानाडोंगरी पशू दवाखाना जवळ गुरुवार दिनांक १६एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता एका अज्ञात व्यक्तीने डोक्यात हेल्मेट घालून येत दुकानासमोर ठेवलेला कुलर उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली. संपूर्ण प्रकार दुकानातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असूनही आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दुकान संचालक प्रकाश गंगाधरजी लारोकर यांनी दिनांक १७एप्रिल २०२६ रोजी MIDC Police Station Nagpur येथे लेखी तक्रार दिली. मात्र तक्रार घेतल्यानंतर पोलिसांनी “कुलर आत ठेवत चला, दुकानात सुरक्षा गार्ड ठेवा” असा मोफत सल्ला दिल्याची चर्चा आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे चोरीच्या ठिकाणी पोलिसांनी अद्याप साधी पाहणीसुद्धा केली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
CCTV पुरावा उपलब्ध असताना देखील तपासात गती नसल्याने परिसरातील छोट्या-मोठ्या चोरट्यांची हिंमत वाढत असल्याचे नागरिक सांगत आहेत. व्यापाऱ्यांचा सवाल आहे की, जर CCTV फुटेज असूनही कारवाई होत नसेल तर सामान्य नागरिकांनी नेमके कोणाकडे न्याय मागायचा?
वानाडोंगरी परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलिस विभागाने तातडीने आरोपीचा शोध घेऊन कडक कारवाई करावी, अन्यथा व्यापारी व नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा स्थानिकांकडून देण्यात येत आहे.
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015