*पोलीस कुटुंबातील संघर्षाला यशाचे सुवर्णफळ; मिलिंद उईके यांनी मिळवली एमबीबीएस पदवी*!
*पोलीस कुटुंबातील संघर्षाला यशाचे सुवर्णफळ; मिलिंद उईके यांनी मिळवली एमबीबीएस पदवी*!
(गजानन ढाकुलकर ) नागपूर शहर पोलीस खात्यात कार्यरत असलेले भाऊतुल्य मित्र श्री प्रकाशराव उईके यांच्या कुटुंबासाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण नुकताच अनुभवायला मिळाला. त्यांचे चिरंजीव डॉ. मिलिंद प्रकाशराव उईके यांनी शासकीय मेडिकल रुग्णालय येथून एमबीबीएसची पदवी यशस्वीरित्या संपादन केली. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार म्हणून प्रकाशराव उईके सहपरिवार उपस्थित होते आणि मुलाला अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. संपूर्ण कुटुंबासाठी हा क्षण अत्यंत उल्हासपूर्ण आणि भावनिक ठरला.
पोलीस खात्यात नोकरी करताना कर्तव्याच्या धावपळीत कुटुंबासाठी वेळ देणे अनेकदा कठीण होते. अशा परिस्थितीत सौ. वैशाली प्रकाशराव उईके यांनी अथक परिश्रम, त्याग आणि जिद्दीच्या जोरावर मुलाला वैद्यकीय अधिकारी बनविण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्यांच्या कष्टाचे आज सोनं झाल्याची भावना उपस्थितांमध्ये होती.
या यशस्वी क्षणानिमित्त रमेश कनेरे (सेवानिवृत्त पोलीस, नागपूर शहर), स्वयंसेवक व रुग्णदूत, केंद्रीय मानव अधिकार संघटना नवी मुंबईचे नागपूर शहर प्रसिद्धी प्रमुख, तसेच सामाजिक कार्यकर्ते विकासजी मिश्रा, अमितजी यादव, प्रवीणजी शर्मा, सचिनजी शर्मा यांनी डॉ. मिलिंद यांना पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
काही शुभेच्छुकांना या छोटेखानी कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही, तरी त्यांनी मनापासून शुभेच्छांचा वर्षाव केला. कार्यक्रमानंतर सर्वांनी आनंद व्यक्त करत पुढील सामाजिक कार्यासाठी रवाना होत, डॉ. मिलिंद यांच्या यशाचा गौरव केला.
डॉ. मिलिंद उईके यांच्या या यशामुळे पोलीस कुटुंबातील संघर्ष, मेहनत आणि शिक्षणाची जिद्द पुन्हा एकदा समाजासमोर आदर्श ठरली आहे. संपूर्ण नागपूर शहरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015