logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

Aima midiya jan jan ki avaj Date 19.4.2026 am 12:08 गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी खासगी कंपनीवर छापा पुण्यातील एका खासगी कंपनीने गुंतवणुकीवर मोठ्या

Aima midiya jan jan ki avaj Date 19.4.2026 am 12:08 गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी खासगी कंपनीवर छापा
पुण्यातील एका खासगी कंपनीने गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून २ हजार गुंतवणूकदारांची ४२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.पुणे : गुंतवणुकीवर परतावा देण्याचे आमिष दाखवून ४२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने एका खासगी कंपनीच्या दोन संचालकांविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल केला. संचालकांचे निवासस्थान, तसेच कार्यालयावर छापा टाकण्यात आला असून, काही कागदपत्रे जप्त केली आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कंपनीच्या संचालकांविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारअर्ज देण्यात आला होता. या तक्रारीच्या अनुषंगाने तपास करून शनिवारी सायंकाळी अलंकार पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कर्वे रस्त्यावरील एका इमारतीत या कंपनीचे कार्यालय आहे.

पोलिसांच्या पथकाने या कार्यालयावर छापा टाकला. तसेच संचालकांच्या सॅलिसबरी पार्क आणि बिबवेवाडी भागातील निवासस्थानी सायंकाळी छापे टाकण्यात आले. जुलै २०२२ ते एप्रिल २०२६ या कालावधीत त्यांनी गुंतवणूकदारांकडून पैसे स्वीकारले होते. सुरुवातीला त्यांनी परतावा दिला होता. त्यानंतर त्यांनी परतावा देणे बंद केले होते. याप्रकरणी शासनाकडून अनियमित (अनधिकृत) ठेवी योजना बंदी कायदा २०१९ च्या कलम २१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्राथमिक चौकशीत त्यांनी दोन हजार गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. त्या अनुषंगाने आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे. – विवेक मासाळ, पोलीस उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा

0
0 views

Comment