logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

Aima midiya jan jan ki avaj Date 19.4.2026 am11:33 श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य आंब्यांचे प्रसिद्ध व्यापारी देसाई बंधू आ

Aima midiya jan jan ki avaj Date 19.4.2026 am11:33 श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य
आंब्यांचे प्रसिद्ध व्यापारी देसाई बंधू आंबेवालेचे संचालक मंदार देसाई कुटुंबियांच्यावतीने हा नैवेद्य देण्यात आला.पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला रविवारी ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. अक्षय तृतीयेच्या मंगलदिनी भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केली होती.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे गणपती मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यामध्ये गणरायाला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. आंब्यांचे प्रसिद्ध व्यापारी देसाई बंधू आंबेवालेचे संचालक मंदार देसाई कुटुंबियांच्यावतीने हा नैवेद्य देण्यात आला.

मंदिरात रविवारी पहाटे तीन वाजता ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक झाला. त्यानंतर प्रसिद्ध गायिका मंजूषा पाटील यांनी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. सकाळी आठ वाजता गणेशयाग झाला. आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्णांना, श्रीवत्समधील मुलांना तसेच वृद्धाश्रम व दिव्यांग मुलांच्या संस्था व मंदिरात भाविकांना देण्यात येणार आहे.



4
235 views

Comment