logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

शिरसोलीत धार्मिक भावना दुखावल्याने एकाला अटक



जळगाव/शिरसोली : गावात लावलेल्या
बॅनरची नासधूस करून तसा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी सागर दिलीप - ताडे (३४, रा.शिरसोली प्र.बो.) याला अटक करण्यात आली आहे.

शिरसोली प्र.बो. येथे लावलेले बॅनर फाडण्यात आले, तसेच त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याने १८ एप्रिल रोजी, गावात तणाव निर्माण झाला होता. यामुळे गावात दुकाने बंद करण्यात


आली होती. एमआयडीसी पोलिसांनी संबंधितावर कारवाईची ग्वाही दिली. त्यावेळी तणाव निवळला. सध्या गावात बंदोबस्त कायम आहे. याबाबत सागर ताडे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

6
483 views

Comment