logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

११ गुंठ्यात अडीच लाखांची झेप! डोणगावच्या वैभव नव्हाळे यांनी जिद्दीच्या जोरावर 'शेती' करून दाखवली

११ गुंठ्यात अडीच लाखांची झेप! डोणगावच्या वैभव नव्हाळे यांनी जिद्दीच्या जोरावर 'शेती' करून दाखवली

डोणगाव: प्रतिनिधी सालार बेग

"शेती परवडत नाही" या सार्वत्रिक मानसिकतेवर मात करत डोणगाव येथील प्रयोगशील शेतकरी वैभव नव्हाळे यांनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे. अवघ्या ११ गुंठे जमिनीत केवळ ६,५०० रुपयांची गुंतवणूक करून त्यांनी २ लाख ५० हजार रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. त्यांच्या या यशोगाथेची सध्या संपूर्ण परिसरात चर्चा होत आहे.
गावरान जांभळ्या लसणाची किमया
वैभव यांनी पारंपारिक पिकांच्या चक्रात न अडकता आधुनिक आणि बाजारपेठभिमुख शेतीचा पर्याय निवडला. त्यांनी प्रगतशील शेतकरी संजय पाटील आखाडे यांच्याकडून गावरान जांभळ्या लसणाचे बियाणे खरेदी केले. अत्यंत कमी क्षेत्रात योग्य नियोजन केल्यास सोन्यासारखे पीक घेता येते, हे त्यांनी सिद्ध केले. केवळ ११ गुंठे क्षेत्राचा अचूक वापर.बियाणे आणि खतांसाठी केवळ ६,५०० रुपये खर्च. ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचा काटेकोर वापर आणि सेंद्रिय खतांवर दिलेला भर.पिकाची निवड करताना बाजारपेठेतील मागणीचा केलेला विचार.आज अनेक तरुण शेतकरी कमी जमिनीमुळे शेतीकडे पाठ फिरवत आहेत. मात्र, वैभव नव्हाळे यांनी "क्षेत्र महत्त्वाचे नसून कामाची पद्धत महत्त्वाची आहे" हे कृतीतून दाखवून दिले आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक होत असून, शासनाने अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची मागणी होत आहे.

42
1686 views

Comment