logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

MIDC हद्दीतील बनावट सुगंधीत तंबाखु तयार करण्याचा कारखाना उध्वस्त....

MIDC हद्दीतील बनावट सुगंधीत तंबाखु तयार करण्याचा कारखाना उध्वस्त....


नगर (शिवप्रहार न्यूज नेटवर्क) या बातमीची हकीगत अशी की,श्री सोमनाथ घार्गे,पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेश दिलेले आहेत.त्या आदेशानुसार श्री किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सुनिल पवार, गणेश धोत्रे,शाहिद शेख,बिरप्पा करमल, संतोष खैरे, शिवाजी कावडे, अरविंद भिंगारदिवे, उमाकांत गावडे,महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांचे पथक तयार करुन सदर पथकास अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना करण्यात आले होते.
आज दिनांक 18/04/2026 रोजी वरील पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे असिफ खुदाबक्ष तांबोळी रा. मुकुंदनगर, ता. जि. अहिल्यानगर हा त्याचे साथीदारांसह कालीमाता मंदीराजवळ,गजराजनगर या ठिकाणी त्याचे घरामध्ये साधी तंबाखु आणुन विक्रीस प्रतिबंध असलेली व शरीरास अपायकारक होईल असा खादय पदार्थ सुगंधीत तंबाखु तयार करण्याचा कारखाना चालवित असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने तात्काळ सदर माहिती श्री.राजेश बडे, अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन विभाग अहिल्यानगर यांना कळवुन त्यांना कारवाईकामी बोलावुन घेतले.पथकाने अन्न सुरक्षा अधिकारी यांचेसह बातमीतील ठिकाणी जावुन खात्री केली असता सदर ठिकाणी 3 इसम सुगंधीत तंबाखु तयार करतांना मिळुन आले.त्या तिघांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) असिफ खुदाबक्ष तांबोळी वय - 50 वर्षे, रा. मुकुंदनगर, ता. जि. अहिल्यानगर, 2) जफर चाँद शेख वय - 38 वर्षे, रा. बडी मस्जिदजवळ, मुकुंदनगर, ता. जि. अहिल्यानगर, 3) दाऊद बाबुमियाँ शेख वय - 42 वर्षे, रा. सदर बाजार भिंगार, ता. जि. अहिल्यानगर असे असल्याचे कळविले. ताब्यातील आरोपींकडून एकुण 13,92,190/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीविरुध्द पोहेकॉ/492 सुनिल विनायक पवार नेम - स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे गु.र.नं. 255/2026 प्रमाणे विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे करीत आहे. हि कारवाई श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

3
89 views

Comment