logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

कृषी विज्ञान क्षेत्रात पीएच.डी. मिळवून डॉ. दिव्या कोकणी यांचा मानाचा तुरा

कोकणी आदिवासी समाजासाठी अभिमानास्पद ठरलेल्या डॉ. कु. दिव्या किरण कोकणी यांनी कृषी विज्ञान क्षेत्रात पीएच.डी. ही उच्च पदवी सन्मानाने संपादन केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दि. १६ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे पार पडलेल्या ४४ व्या पदवीदान समारंभात राज्याचे कृषी मंत्री मा. दत्तात्रय भरणे, माजी केंद्रीय मंत्री मा. सुरेश प्रभू तसेच कुलगुरू मा. संजय भावे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली.
सुसंस्कृत, मितभाषी आणि ध्येयवेड्या स्वभावामुळे ओळखल्या जाणाऱ्या डॉ. दिव्या कोकणी यांचे हे यश समाजातील अनेक तरुणींसाठी प्रेरणादायी ठरत आहे. "समाजाची प्रगती ही शिक्षित युवा पिढीवर अवलंबून असते" याचा प्रत्यय त्यांच्या यशातून येतो.
या यशाबद्दल श्री. सतिश गावित, श्रीराम गावित, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. किरण कोकणी सर तसेच संपूर्ण गावित-पवार कुटुंबाचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठानने विद्यार्थ्यांना दिलेल्या सहकार्याबद्दल तसेच श्रावणीकर गावित बंधूंच्या रु. २१५१/- देणगीबद्दल विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
डॉ. दिव्या कोकणी यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देत, त्यांचे यश समाजासाठी अभिमानाची बाब असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.



130
6636 views

Comment