logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*इसासनी-वागधरा येथे शासकीय जमिनीवर अतिक्रमणाचा स्फोटक आरोप! माजी सरपंचांची पालकमंत्र्यांकडे धाव*

*इसासनी-वागधरा येथे शासकीय जमिनीवर अतिक्रमणाचा स्फोटक आरोप! माजी सरपंचांची पालकमंत्र्यांकडे धाव*

हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील इसासनी-वागधरा ग्रामपंचायत हद्दीत शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. माजी सरपंच संतोष गोपीचंद कटरे यांनी थेट महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी तक्रार करून उच्चस्तरीय चौकशी व तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

तक्रारीनुसार, शांती नगर, बुद्ध नगरी व बहुजन नगर परिसरातील खसरा क्रमांक एक, सहा व सात या शासकीय जमिनीवर संघटित पद्धतीने कब्जा करण्यात आला आहे. काही स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व प्रभावशाली व्यक्तींच्या संगनमताने नागरिकांकडून लाखो रुपये घेऊन जागा ताब्यात देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात काही स्थानिक सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पदाधिकाऱ्यांची नावेही चर्चेत आली आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे, ज्या ठिकाणी अतिक्रमण झाले त्या भागात सिमेंट रस्ते, पाणी पाईपलाईन व इतर विकासकामे करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. म्हणजेच बेकायदेशीर अतिक्रमणालाच शासकीय सुविधांचा आधार दिला जात असल्याचा आरोप होत आहे. तसेच अतिक्रमणासाठी त्या भागातील तलावही बुजविण्यात आला असून पर्यावरणीय हानी झाल्याची बाब समोर आली आहे.

माजी सरपंच संतोष कटरे यांनी या प्रकरणाला विरोध केल्यानंतर एकोणतीस मार्च दोन हजार सव्वीस रोजी त्यांच्यावर मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही कारवाई झाली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. उलट पोलिसांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

कटरे यांनी आपल्या जीवितास धोका असल्याचे सांगत स्वतःस व कुटुंबास पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित अतिक्रमणधारक, अधिकारी व निष्क्रिय पोलिसांवर फौजदारी गुन्हे दाखल करून शासकीय जमीन मोकळी करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

या स्फोटक तक्रारीमुळे इसासनी-वागधरा परिसरात खळबळ उडाली असून आता पालकमंत्री बावनकुळे या प्रकरणात काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
46 views

Comment