logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

महिलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंगीकारावे - प्रकल्प समन्वयक लोकप्रिया देशभ्रतार खोकरला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

महिलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंगीकारावे - प्रकल्प समन्वयक लोकप्रिया देशभ्रतार
खोकरला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

विलास केजरकर भंडारा.

भंडारा:- संपूर्ण जगासाठी न्यायाचा व समतेचा विचार देणारे बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने विश्वरत्न आहेत. जगातील सर्वात श्रेष्ठ संविधान देऊन त्यांनी प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. त्यांनी विषमतेकडून समानतेकडे मानवाला आणले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुरूषांबरोबर महिलांना अधिकार दिल्याने आज महिलावर्ग मोठ्या प्रमाणात विश्वात अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत. ​म्हणून महिलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंगीकारावे असे प्रतिपादन जिल्हा महिला बाल विकास कार्यलय अंतर्गत चाईल्ड लाईन भंडाराच्या प्रकल्प समन्वयक लोकप्रिया देशभ्रतार यांनी केले.
त्या स्व. नितीन सामाजिक विकास बहुउद्देशीय संस्थेत भंडारा च्या वतीने खोकरला येथे आयोजित भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ वी जयंती कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा महिला बाल विकास कार्यलय अंतर्गत चाईल्ड लाईन भंडारा च्या प्रकल्प समन्वयक लोकप्रिया देशभ्रतार होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून खोकरला येथील सरपंचा वैशाली सार्वे, युवा परिवर्तनच्या मॅनेजर रंगारी, सीआरपी रोडे, स्व. नितीन सामाजिक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा शैलजा राऊत, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व मार्ल्यापण करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनातील विविध मार्मिक प्रसंगावर उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. व सर्वांना पेढे वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक संस्थेच्या कार्यकर्त्या पल्लवी खंडाइत यांनी केले तर उपस्थितांचे आभार यामिनी धकाते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनिता बोरसे, निकिता उईके, माधुरी नेवारे, ज्योत्स्ना वैद्य इत्यादी विद्यार्थी विद्यार्थिनी स्व. नितीन सामाजिक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकारी व कर्मचारी, महिलांनी सहकार्य केले.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

5
331 views

Comment