logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

फुरसुंगी भोसले विलेजमध्ये स्ट्रीट लाईटचे काम वेगाने पूर्ण.

फुरसुंगी भोसले विलेज परिसरात नागरिकांच्या तक्रारीनंतर स्ट्रीट लाईटचे काम तातडीने पूर्ण करण्यात आले आहे. परिसरात अनेक दिवसांपासून स्ट्रीट लाईट बंद असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत होता. यामुळे सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला होता.
स्थानिक नागरिकांनी या समस्येबाबत नगरसेवक श्री . चंद्रकांत ढमाळ यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेत नगरसेवकांनी संबंधित विभागाला तत्काळ निर्देश दिले. त्यानुसार कामाला वेग देत परिसरातील स्ट्रीट लाईटची दुरुस्ती व बसविण्याचे काम अल्पावधीत पूर्ण करण्यात आले. व काम पूर्ण होई पर्यंत सौ. प्राची चंद्रकांत ढमाळ( सामाजिक कार्यकर्त्या) स्वतः उभ्या राहून काम करून घेतले.
या कामामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, रात्रीच्या वेळी सुरक्षितता वाढल्याची भावना व्यक्त केली आहे. नागरिकांनी व श्री भाऊसाहेब चोपडे व पत्रकार किशोर गायकवाड यांनी प्रशासनाचे व नगरसेवकांचे विशेष आभार मानले आहेत.

19
1238 views

Comment