logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

एकनाथ सोमाजी जेंगठे यांच्या जीवास काही कमी जास्त झाल्यास कोण जबाबदार राहणार ? पीडित व्यक्ती एकनाथ सोमाजी जेंगठे यांची मागणी.

ज्या अर्थी एकनाथ जेंगठे हे कुटुंबासह मौजा चक विठ्ठलवाडा तहसील गोंडपिपरी जिल्हा चंद्रपूर येथे राहत असून शेती व्यवसाय करीत असून ट्रॅक्टरच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांच्या शेतीची मशागतीचे काम करून उदरनिर्वाह करीत होते. श्री जनार्दन विस्तारी राऊत यांच्या मालकीची गावठाणातील खुली जागा 5775.00 चौ. फूट दि. 29-01-2019 रोजी एकनाथ सोमाची जिंकते यांनी विकत घेतली व तेव्हापासून घराशेजारील घराशेजारील लोकांची एकनाथ समाधी जिंकते यांना मानसिक त्रास देणे सुरू केले एवढेच नव्हे तर शेजारील लोकांनी अनेक वेळा सदर होऊन जागा सोडण्यासाठी जिवंत मारण्याच्या धमक्या सुद्धा दिल्यात.त्यामुळे एकनाथ जेंगठे यांनी पोलीस प्रशासनाकडे व मानव अधिकार आयोगाकडे तक्रार केली,तसेच सरपंच/ सचिव यांना सुद्धा अनेक वेळा तक्रारी केल्यास मात्र आरोपींचे वकील ऍड.मंगेश काळे यांनी सदर प्रकरण वारंवार दाबण्याचा प्रयत्न केला व एकनाथ सोमाधी जिंकते यांचे वरच आरोपी आता रवींद्र लिंगे श्रीकांत मासीरकर,धम्मदीप मेश्राम,हारुण शेख,असीम बॅनर्जी व शंकर मन्ने यांनी एकनाथ सोमाजी जेंगठे हा पागल असल्याचे सांगून बदनामी केल्यामुळे सदरहू बदनामी मुळे एकनाथ सोमाजी जेंगठे यांची पत्नी व मुलं गाव सोडून निघून गेले, शेती पडीत झाली,ट्रॅक्टर गेली अशाप्रकारे एकनाथ सोमाजी जेंगठे यांचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले. पोलीस प्रशासनाला अनेक वेळा आरोपी यांचे विरुद्ध तक्रार करून त्यांच्यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली नसल्यामुळे आरोपींची हिम्मत वाढून त्यांनी एकनाथ सोमाजी जेंगठे यांना गावात आल्यास जिवंत मारून टाकू अशी धमकी दिलेली आहे. त्यामुळे आरोपीकडून एकनाथ सोमाजी जेंगठे यांचा जीविकास धोका निर्माण झाला असून जर यदा कदाचित एकनाथ सोमाजी जेंगठे यांचा जीविकास काही कमी जास्त झाल्यास त्यास संबंधित आरोपी,पोलीस प्रशासन व ॲडव्होकेट मंगेश काळे यांना जबाबदार धरण्यात यावे अशी मागणी एकनाथ सोमाजी जेंगठे यांनी ऑल इंडिया मीडिया असोसिएशन कडे केली आहे.

0
104 views

Comment