आव्हाण्यातील वृद्धाचा गिरणा नदीत पडल्याने मृत्यू
जळगाव : आव्हाणे येथे गिरणा नदीच्या पात्रात पाय घसरून पड़ल्याने एका ६६ वर्षीय वृद्धाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी, १६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. किसन रामचंद्र मोरे असे मृत वृद्धाचे नाव आहे.
मोरे हे गिरणा नदीपात्राच्या बाजूने जात होते. यावेळी अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते नदीच्या खोल पाण्यात पडले. त्यांना पोहता येत नसल्याने ते बुडू लागले. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी नदीत उड्या घेऊन मोरे यांना पाण्याबाहेर काढले व जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. रक्षा रोकडे यांनी त्यांना तपासले असता, त्यांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.