logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

समस्त कक्कय्या समाज महासंघाच्या रोप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने २६एप्रिल२०२६ रोजी धारावीत महाअधिवेशन!

समस्त कक्कय्या समाज महासंघाच्या रोप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने २६एप्रिल२०२६ रोजी धारावीत महाअधिवेशन!

मुंबई :(दत्ता खंदारे )समस्त कक्कय्या समाज महासंघाच्या रोप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने समाजातील सर्व घटकांना एकत्रित आणण्यासाठी आणि सरकारकडे कक्कय्या समाजाच्या मागण्या मांडून त्या सोडविण्यासाठी रविवार दिनांक २६एप्रिल २०२६ रोजी धारावीत एकदिवशीय महाअधिवेशन घेण्यात येणार आहे.सदर महाअधिवेशन मनोहर जोशी विद्यालय, प्रांगण, धारावी डेपो,पी एम जी पी संकुल जवळ, धारावी - मुंबई ४०० ०१७ येथे सकाळी ९ते ६ या वेळेत होणार आहे.
ढोर कक्कय्या समाज हा प्रमुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगना, गुजरात या राज्यात विखुरलेला आहे आणि लहान मोठी मंडळे हि कक्कय्या समाजाच्या
सर्वांगीण विकासासाठी आपल्या विभागात विविध समाज उपयोगी कार्य २५ वर्षापासून करीत आहे. ही एक सामाजिक दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे.
कक्कय्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एक मध्यवर्ती संघटना असावी व समाज संघटीत होऊन एकी निर्माण व्हावी व समाजातील अन्याय
अत्याचार विरोधात लढण्यासाठी बळ मिळावे अशी संकल्पना, अनेक जेष्ठ मान्यवरांनी विचारात घेतली. समस्त कक्कय्या समाज महासंघाची स्थापना
सन २००० मध्ये देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात सर्वानुमते स्थापन करण्यात आली. ही संस्था गेल्या २५ वर्षापासून कार्यन्वित असून
अनेक समाज उपयोगी कार्यक्रम पार पाडीत आहे.

महासंघातील ध्येय व उदिष्ट्ये :
१) संपूर्ण भारतातील कक्कय्या समाजाला एकत्र करणे, एका छत्राखाली आणुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे.
अ) मुंबई व मुंबईच्या आसपास एक भव्य संत कक्कय्या भवन बांधणे, शाळा, कॉलेज, तांत्रिक महाविदयालय, वैद्यकिय महाविदयालय निर्माण करणे.
ब) जिल्हा व तालुका जागेत सामाजिक न्याय विभागाकडून समाज मंदिर सभागृह निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे.
2) कक्कय्या समाजातील विविध मंडळाकडून /संस्थेकडून जे कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्यांचा कार्यात सहभागी होऊन त्यांना मार्गदर्शन करणे.
३) अखिल भारत वर्षातील अस्तित्वात असलेली कक्कय्या समाजातील मंडळे व संस्था त्यांचे अस्तित्व अबाधित ठेऊन त्यांना महासंघाशी सलग्न करून
महासंघाच्या कार्यात सक्रीय करून घेणे.
४) महासंघातर्फे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, नोकरी धंदा, आरोग्यविषयक, साहित्यिक, पत्रकार इ. समाजउपयोगी कार्यक्रम राबविण्याचे उदिष्ट्य आहे.
५) खेडेगावातून मुंबईत येणाऱ्या समाज बांधवांसाठी व राहण्यासाठी संत कक्कय्या महाराज वस्तीगृह बांधणे.

महासंघाच्या महाराष्ट्र शासनास प्रमुख मागण्याः
१) माननीय माजी मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात कक्कय्या ढोर समाजासाठी श्री संत वीरशैव कक्कय्या महाराज या नावाने आर्थिक महामंडळाची घोषणा केलेली आहे. परंतु सबंधीत GR निघालेला नाही, तरी शासनाने GR त्वरीत काढावा.
२) हिंदु अनुसूचित जाती पैकी चर्मकार ढोर कक्कया समाजाचे आराध्य दैवत " श्री संत वीरशैव कक्कय्या महाराज " असुन त्यांची जयंती शासनाच्या वतीने साजरी करण्यात यावी आणि त्यांना राष्ट्रीय संत घोषित करण्यात यावे.
अ) श्री संत कक्कय्या महाराजांचे मुंबईत भव्य दिव्य स्मारक उभारण्यात यावे.
ब) चर्मकार ढोर कक्कय्या समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीला " श्री संत कक्कय्या महाराज " यांच्या नावाने सामाजिक न्याय विभागाच्या वतीने
समाजभूषण पुरस्कार घोषित करण्यात यावे.
क) मागासवर्गीयातील राजकिय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीला लोकनेते माजी खासदार कै. तायप्पा हरी सोनवणे(युनोमध्ये १९६८ साली ) भारताचे प्रतिनिधित्व केल्याने यांच्या नावे "उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार" देण्यात यावा.
ड) मुंबई प्रांताचे पहिले दलित मंत्री, माजी राज्यपाल कै. गणपतराव तपासे (स्वातंत्र सैनिक) यांच्या नावे वारकऱ्यांसाठी धार्मिक उल्लेखनिय कार्य केलेल्या वारकरी संप्रदायातील व्यक्तीला " सामाजिक समरसता पुरस्कार" देण्यात यावा.
इ) माजी आमदार, स्वातंत्र्यसैनिक, लेखक, साहित्यिक, नाटककार, पत्रकार, संपादक कै. नामदेवराव व्हटकर यांच्या नावाने मागासवर्गीय
साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला " साहित्य रत्न पुरस्कार" देण्यात यावा.
३) संत रोहिदास लिडकॉम चर्मोद्योग विकास महामंडळाच्या चर्मकार ढोर कक्कय्या समाजाच्या व्यक्तींची चेअरमन पदावर नियुक्ती करण्यात यावी.
अ) उद्योग धंद्यासाठी कर्जदारांना जामीनाची अट रद्द करण्यात यावी.
ब) कर्जदारांना उद्योगधंद्यासाठी कमीतकमी दहा लाख रुपये एका व्यक्तीला कर्ज मंजूर करावे. महामंडळास शंभर कोटी रुपये आर्थिक अनुदान
देण्यात यावे आणि प्रत्येक वर्षी २५% प्रमाणात वाढ करण्यात यावी.
क) कर्जाचा अर्ज मंजूर करण्यासाठी जिल्हा कार्यालयास अधिकार देण्यात यावे व जिल्हा कार्यालयात पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून द्यावा.
५) अनुसूचित जातीतील चर्मकार हिंदू ढोर कक्कय्या जातीच्या विद्यार्थ्यांना जातीच्या दाखल्यासाठी व जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी १९५० वर्षांपूर्वीची अट रद्द
करण्यात यावी व जे रहिवासी एका ठिकाणी २५ वर्षांपासून राहतात त्यांना राहत असलेल्या ठिकाणी तहसीलदार यांजकडून जात दाखला देण्यात यावा.
६) अनुसूचित जाती आयोगावर गेली २० वर्षांपासून चर्मकार ढोर कक्कय्या समाजाला प्रतिनिधित्व मिळाले नाही. सदर आयोगावर समाजास अध्यक्ष/उपाध्यक्ष /
सदस्य पदावर घेऊन प्रतिनिधीत्व देण्यात यावे.
७) अनुसूचित जाती चर्मकार ढोर कक्कय्या समाज ज्या ठिकाणी रहिवासी आहेत तिथे समाज न्याय विभागातर्फे समाज मंदिर सभागृह बांधून देण्यात यावे.
८)आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या अनुसूचित जातीच्या चर्मकार ढोर कक्कय्या समाजाच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य देण्यात यावे.
९) महाराष्ट्रातील सर्व गावोगावी, तालुका, जिल्हा ठिकाणी असलेल्या जुने मंदिर सुधारणा करुन देणे. जिर्णोद्धार करुन देणे.
१०) हिंदू चर्मकार ढोर कक्कया समाजाच्या एका व्यक्तीला विधान परिषदेत / राज्यसभेवर निवडून द्यावे
या सर्व मागण्या मान्य करुन घेण्यासाठी कक्कय्या (ढोर )समाज बांधवानी मोठया संख्यने उपस्थित रहावे असे अवाहन समस्त कक्कय्या समाज महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

49
2938 views

Comment