logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

नांदेड : भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर आणि महिला मोर्चा प्रदेश चिटणीस सुमती व्याहाळकर यांच्या पुढाकारातून आयोजित केले.



नांदेड : भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर आणि महिला मोर्चा प्रदेश चिटणीस सुमती व्याहाळकर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या मोफत एचपीव्ही लसीकरण शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. रमेश माने यांच्या हस्ते तर डॉ. रमेश नारलावार यांच्या अध्यक्षतेखाली व शीतल खांडील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले.मुलींमध्ये होणारा गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत २७ मुलींना सुमारे ₹४५०० किंमतीची लस पूर्णपणे मोफत देण्यात आली.

भाजप नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, अमरनाथ यात्रेकरू संघ तसेच मनपा नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने शिवशक्तीनगर, नांदेड येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात १४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. खा. अशोकराव चव्हाण, खा. डॉ. अजित गोपछडे, प्रदेश उपाध्यक्ष संजय कोडगे व चैतन्य देशमुख, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे व ॲड. किशोर देशमुख, महापौर कविता मुळे, उपमहापौर दीपकसिंह रावत, सभागृह नेते ॲड. महेश कनकदंडे,लायन्स उपप्रांतपाल योगेश जायस्वाल यांच्या मार्गदर्शन मिळाले.

संयोजक ॲड. दिलीप ठाकूर यांनी शिबिरामागील उद्दिष्ट स्पष्ट करताना, समाजात कर्करोग प्रतिबंधाबाबत जनजागृती होणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत रिठे व वैद्यकीय अधिकारी डॉ. रितेशसिंह बिसेन यांनी मार्गदर्शन करताना एचपीव्ही लसीबाबत समाजमाध्यमांवर पसरविण्यात येणाऱ्या गैरसमजुती दूर करण्याचे आवाहन केले.या प्रसंगी बालाजी निलपत्रेवार, अनिल सूर्यवंशी, पुष्पराज राठोड, अशोक साखरे, कालिंदी कहाळेकर, रेखा नगारे, किशनराव पाळवेकर, दमाम, फुलाबाई भोसले, कुसुमताई नागनूरवार, किशोर लोंढे यांचा शिरोपाव व मोत्याची माळ देऊन सत्कार करण्यात आला. माजी नगरसेविका जयश्री ठाकूर यांच्या हस्ते लस घेतलेल्या मुलींना गुलाब पुष्प देण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेशसिंह ठाकूर यांनी केले, तर आभार नरसिंह कहाळेकर यांनी मानले. मनपा कर्मचाऱ्यांमध्ये शेख फिरोज, रवि धुतमल, शेख सुमैय्या, अनुराधा शिवशेट्टे, अंबिका थोटे, देऊबाई लव्हाळे, अनिता हनमंते, पुष्पा खाडे, जिजाबाई गायकवाड, लता सूर्यवंशी यांनी कर्तव्य बजावत शिबिर यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली.तसेच दिपकसिंह ठाकूर, संतोष भारती, गजानन कापसे, नारायण पाळवेकर, दिगंबर येडशीकर, राहुल बनसोडे, महादू लुटे यांनी विशेष परिश्रम घेतले.नांदेड शहरात कर्करोग प्रतिबंधासाठी अशा प्रकारचे पहिलेच शिबिर आयोजित केल्याबद्दल ॲड. दिलीप ठाकूर यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

1
78 views

Comment