logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

परिवहन मंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच तक्रारींचा भडका; कल्याण आगारातील चालक तथा वाहकाविरुद्ध आरोप १८' ४ ' २o२६

परिवहन मंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच तक्रारींचा भडका; कल्याण आगारातील चालक तथा वाहकाविरुद्ध आरोप
परिवहन मंत्र्यांच्या बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाणे विभागातील कल्याण आगारातच आता कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचा भडका उडाला आहे. येथील चालक तथा वाहक श्री.रामदास सदाकाळ यांच्या बेशिस्त वर्तनाविरुद्ध कर्मचाऱ्यांनी राज्याच्या परिवहन मंत्र्याकडे गंभीर तक्रार दाखल केली आहे.
कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनुसार नुसार,संबंधित कर्मचाऱ्याकडून सहकाऱ्यांशी अयोग्य वर्तन,मारहाण,शिवीगाळ,तसेच मानसिक व शारीरिक त्रास दिला जात आहे.यामुळे आगारातील कामकाजावर त्याचा गंभीर परिणाम होत असून, कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे, हा प्रकार थेट परिवहन मंत्र्यांच्या प्रभावक्षेत्रात घडत असल्याने या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे. कर्मचाऱ्यांनी यापूर्वीही प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असल्याचा दावा केला आहे. मात्र, अद्याप ठोस कारवाई न झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
काही घटनांमध्ये वाद वाढून प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून संबंधितावर बदली सारखी कठोर कारवाई करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
दरम्यान, कामाच्या ठिकाणी सुरक्षित व शांत वातावरण निर्माण करण्यासाठी परिवहन विभागाने याप्रकरणी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

40
962 views

Comment