logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंगीकारावे - सुरेश सतदेवे

समीर वर्ल्ड कॉम्प्युटर एज्युकेशन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
समीर नवाज भंडारा.

भंडारा:- संपूर्ण जगासाठी न्यायाचा आणि समतेचा विचार देणारे बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने विश्वरत्न आहेत. जगातील सर्वात श्रेष्ठ संविधान देऊन त्यांनी प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. ​क्रांतिसूर्य म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा हा क्रांतीसूर्य आजही आपल्याला प्रत्येक संकटात मार्ग दाखवत आहे. ​नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंगीकारावे असे प्रतिपादन आंबेडकर वादी सुरेश सतदेवे ढगे यांनी केले.
ते समीर वर्ल्ड कॉम्प्युटर एज्युकेशन व महाराष्ट्र राज्य सकल धोबी समाज आरक्षण न्यायिक समिती भंडारा च्या वतीने आयोजित भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ वी जयंती कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ आंबेडकर वादी सुरेश सतदेवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य सकल धोबी समाज आरक्षण न्यायिक समिती भंडारा जिल्हाध्यक्ष विलास केजरकर, सामाजिक कार्यकर्ते राजू सतदेवे, समीर वर्ल्ड कॉम्प्युटर एज्युकेशनचे संचालक समीर नवाज इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व मार्ल्यापण करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनातील विविध मार्मिक प्रसंगावर उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. व सर्वांना पेढे वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभांशू तिरपुडे व प्रास्ताविक समीर नवाज यांनी केले तर उपस्थितांचे आभार किर्ती निपाने हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिशा भजनकर, मीर सतदेवे, जागृती कोसरे, मयुरी नगरे, अदिती उरकुडे, छाया बरबरिया, मिनी शहारे, जयश्री नंदूरकर, निकीता नागरिकर, ज्योती धुर्वे, सलोनी बिसने, दक्ष धुडसे, भविष्य नंदनवार, सोम्या क्षिरसागर, दिशा भोंडेकर, वंश बर्वे, गगन निपाने, वैभव कटकवार, ईशांत नगरे, अनुज बारापात्रे, याचना शेंडे, पुनम लुटे, ईच्छा निंबार्ते इत्यादी विद्यार्थी विद्यार्थिनी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

7
437 views

Comment