logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

डॉ. बाबासाहेबांच्या लढ्याची आठवण देत दौंडमध्ये पाण्यासाठी एल्गार; १७२ तासांची डेडलाईन

दौंड : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्यावर पाण्यासाठी ऐतिहासिक संघर्ष करून जवळपास एक शतक उलटले तरी आजही दौंड नगरपरिषद हद्दीतील अनेक दलित वस्त्यांना हक्काच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. प्रशासनाच्या या तीव्र उदासीनतेविरोधात सामाजिक कार्यकर्ते अमर जोगदंड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना थेट नोटीस बजावली असून, १७२ तासांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र कायदेशीर आंदोलनाचा इशारा दिला आहे. दौडमधील भीमनगर,सम्राटनगर, तुकाईनगर, साठेनगर, सिद्धार्थ नगर, नवगिरे बस्ती आणि जे. के. कॉलनी या वस्त्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याच्या गंभीर तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. स्थानिकांनी वारंवार निवेदने आणि अर्ज देऊनही नगरपरिषद प्रशासनाकडून या समस्येचे निराकरण झालेले नाही. हा केवळ प्रशासकीय निष्काळजीपणा आहे की यामागे काही वेगळी कारणे आहेत, याची आता निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या प्रकरणी अमर जोगदंड यांनी कायदेशीर पवित्रा घेत संविधानातील कलम १४, १५ आणि १७ चा दाखला दिला आहे. समानतेचा हक असतानाही विशिष्ट वस्त्यांना मूलभूत सुविधांपासून बंचित ठेवणे हा घटनात्मक अधिकारांचा भंग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या नोटिशीद्वारे त्यांनी प्रशासनासमोर काही रोखठोक प्रश्न उपस्थित केले असून, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर दिलेल्या १७२ तासांच्या मुदतीत पाणीपुरवठा सुरू झाला नाही, तर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (Atrocity Act) तक्रार दाखल करणे, माननीय उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणे आणि लोकशाही मागीने उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. या अल्टिमेटममुळे आता दाँड नगरपरिषद आणि जिल्हा प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

52
1766 views

Comment