logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

देवळी तालुक्यात काय चाललंय? दारूबंदीचा पूर्ण फज्जा, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर!

देवळी तालुक्यातील काजळसरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात झालेल्या गोंधळाने संपूर्ण परिसर हादरला आहे. एका व्यक्तीने नशेत कार्यक्रमात घुसून महिलांशी गैरवर्तन करत पंगतीत दुचाकी घालून अन्न उधळल्याची धक्कादायक घटना घडली. त्यानंतर तणाव वाढून पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेक आणि पोलीस ठाण्याचा घेराव — या सगळ्यामुळे कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

परंतु हा एकटाच प्रकार नाही…

देवळी शहरातील मीरंणनाथ मंदिर परिसरासह संपूर्ण देवळी तालुक्यात अवैध दारू विक्री खुलेआम सुरू असल्याचे गंभीर आरोप पुढे येत आहेत. याबाबत शासनाच्या तक्रार निवारण पोर्टलवर अधिकृत तक्रार नोंदवूनही ठोस कारवाई होत नसल्याचे दिसून येते.

तक्रारीनुसार, कारवाईपूर्वीच माहिती गळती होत असल्यामुळे अवैध धंदे सुरूच राहतात. तसेच तक्रारदारावर हल्ला होऊन त्याला वैद्यकीय उपचार (MLC) घ्यावा लागल्याचाही उल्लेख आहे.

मुख्य प्रश्न:
देवळी तालुक्यात दारूबंदी कायदा फक्त कागदावरच आहे का?

नागरिकांच्या ठोस मागण्या:
▪️ संपूर्ण देवळी तालुक्यातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करावी
▪️ संबंधित दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी
▪️ लाठीचार्जचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी
▪️ तक्रारदारांना संरक्षण द्यावे

प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा कायदा-सुव्यवस्थेवरील विश्वास ढासळण्याची भीती व्यक्त होत आहे.

53
10524 views

Comment